शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

नागपूर विभागात ४०० सागवानाची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 10:14 IST

राज्याचे वन मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्यातच वन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरक्षित जंगलातील ४००वर सागवानाची झाडे कापण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनिरीक्षण न करताच आरएफओने दिली परवानगीदोषी कोण?, वर्षभरानंतरही अधिकारी अनभिज्ञ कसे?

योगेंद्र शंभरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वन विभागाच्या मदतीने संपूर्ण राज्यात १३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी विविध सरकारी विभागांसह, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संघटनांची मदत घेतली जात आहे. असे असताना, राज्याचे वन मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्यातच वन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरक्षित जंगलातील ४००वर सागवानाची झाडे कापण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.हे गंभीर प्रकरण जिल्ह्याचा कळमेश्वर रेंजच्या सातनवरी बीट अंतर्गत आहे. विशेष म्हणजे, सागवान कापण्याची परवानगी संबंधित क्षेत्रातील कार्यालयाऐवजी हिंगणा रेंज वन परिक्षेत्र अधिकाºयांनी दिली. या प्रकरणाच्या तपासणीनंतर वास्तव समोर येऊन दोन महिन्याचा कालावधी होऊनही नागपूर प्रादेशिक विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दोषींवर कुठलीच कारवाई केली नाही. यामुळे झाडांच्या संरक्षणाला घेऊन वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या गंभीरतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.सूत्रानुसार, कळमेश्वर, पांजरा गावाजवळील वनक्षेत्रातील सातनवरी बीटला लागून बळीराम भोयर यांची शेती आहे. गेल्या वर्षी शेतकरी भोयर यांनी सागवानाच्या कापणीला घेऊन हिंगणा वन परिक्षत्र कार्यालयात अर्ज केला. परंतु हिंगणा वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण न करताच झाडे कापण्याची परवानगी दिली. जेव्हा की संबंधित खसरा क्रमांक ७७ सातनवरी कळमेश्वर रेंजच्या आरक्षित जंगलाचा भाग आहे. हिंगणा कार्यालयाच्या परवानगी नंतर किसान भोयरच्या कंत्राटदाराने त्यांच्या शेतातील सागवनाची झाडे कापण्याऐवजी कळमेश्वर वन क्षेत्रातील बीट नंबर १४९ येथील ४०० सागवानाची झाडे कापली. या कापणीच्या दरम्यान कळमेश्वर संबंधित बीट कम्पार्टमेंटचे वनरक्षक, वनपाल किंवा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही. धक्कादायक म्हणजे, कुणीच कंत्राटदाराच्या झाडे कापण्याच्या परवानगी पत्राची तपासणीही केली नाही. कापलेल्या सागवानाची किंमत आठ लाखांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते.

असे आले प्रकरण समोरशेतकºयाने झाडे कापल्यानंतर सागवानाची वाहतूक केली नव्हती. लाकूड घटनास्थळावरच पडून होते. चार महिन्यांपूर्वी शेतकरी भोयरने मार्च २०१८मध्ये लाकूड वाहतुकीसाठी ‘ट्रान्जिट पास’साठी (टीपी) हिंगणा वन परिक्षेत्र कार्यालयात अर्ज केला. ‘टीपी’च्या दरम्यान वाहतुकीसाठी जाणाऱ्या लाकूडवर नियमानुसार सहायक वनसंरक्षकस्तरावरील अधिकाऱ्याला ‘हॅमर’ मारावा लागतो. ‘एसीएफ’द्वारे घटनास्थळाचे निरीक्षण केल्यावर कापणीचे क्षेत्र खासगी खसरा नसून कळमेश्वर आरक्षित वन क्षेत्र असल्याचे आढळून आले. या संदर्भात जिल्ह्याचे उपवनसंरक्षक (डीसीएफ) जी. मल्लिकार्जुनशी संपर्क होऊ शकला नाही.

कळमेश्वरमध्ये हिंगणा कार्यालयाची परवानगीप्राथमिक तपासणीमध्ये कळमेश्वर बीटमध्ये सागवान कापणीसाठी हिंगणा कार्यालयाने दिलेली परवानगी अवैध असल्याचे सामोर आले. याची सूचना वन विभागाच्या व्हिजीलन्स विभागाला देण्यात आली. व्हिजिलन्सची चमूने अवैध पद्धतीने कापणी करण्याच्या परवानगीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.

कारवाईत चालढकल?सूत्रानुसार, सागवान कापणी प्रकरण सामोर आल्यानंतरही काही दोषींना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. परंतु अद्यापही कठोर कारवाई झाली नाही. प्रादेशिक (नागपूर) विभागांतर्गत अनेक प्रकरणांच्या खुलासानंतरही दोषींवर कारवाईमध्ये चालढकल होत असल्याचा आरोप यापूर्वीही लागला आहे. यामुळे अवैध प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांची हिंमत वाढत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :forestजंगल