शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४०० कोटींची बिले प्रलंबित : आयुक्तांनी मनपाची आर्थिक वस्तुस्थिती मांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 20:22 IST

४०० कोटींची बिले महापालिके कडे प्रलंबित असल्याबाबतची वस्तुस्थिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी महापालिकेच्या विशेष सभेत मांडली.

ठळक मुद्देनिधी उपलब्ध नसल्याने नवीन कामांना मंजुरी नाही : अर्थसंकल्पाच्या तुलनेत जादाच्या विकास कामांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या माध्यमातून शहरात कोणती विकास कामे सुरू आहेत. हाती घेतलेल्या कामांसाठी किती निधी लागणार आहे. यासाठी आर्थिक स्थितीचा आढावा सुरू आहे. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत जादाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. शासकीय योजनातील दायित्व मोठे आहे. ४०० कोटींची बिले महापालिके कडे प्रलंबित असल्याबाबतची वस्तुस्थिती आयुक्ततुकाराम मुंढे यांनी गुरुवारी महापालिकेच्या विशेष सभेत मांडली.नगरसेवक विकासासाठी काम करतात. तसेच प्रशासनही विकासासाठी काम करत आहे. सर्वच विकास कामे बंद केलेली नाहीत. महापालिकेची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी वित्त विभागाचा आढावा घेतला. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. सिमेंट काँक्रीट रस्ते टप्पा-१ व टप्पा -२ मधील १७६ कोटींचा वाटा अद्याप मनपाने दिलेला नाही. हा निधी उपलब्ध केला नाही तर कामे प्रभावित होतील. २४१२.६४ कोटींच्या नागनदी प्रकल्पात मनपाला ३६१.८९ कोटींचा वाटा उचलावयाचा आहे. यातील पहिल्या टप्प्याचा निधी द्यावा लागेल. नगरोत्थान योजनेत मनपाला ३० टक्के वाटा उचलावा लागणार आहे. मनपाकडे उपलब्ध निधी व देणी याचा विचार करता नवीन विकास कामांना निधी उपलब्ध करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत मंजुरी देणे संयुक्तिक होणार नाही. उपलब्ध निधीचा विचार करून प्रशासनाने कार्यादेशन न देण्याबाबत निर्णय घेतल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.स्थायी समिती व सभागृहाने मंजुरी दिलेल्या कामांचे कार्यादेश थांबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. स्थायी समितीला वित्तीय अधिकार नाही का, यासंदर्भात प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी नगरसेवक प्रवीण दटके यांनी केली. यावर आयुक्तांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबतची वस्तुस्थिती मांडली. काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी महापालिकेच्या आर्थिंक स्थितीवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित करण्याची मागणी केली.नगरसेवकाच्या फाईलवर आयुक्तांनी व विभाग प्रमुखांनी आधी मंजुरी दिली असेल तर अशी कामे सुरू करावी. अशी सूचना प्रवीण दटके यांनी मांडली. अविनाश ठाकरे म्हणाले, स्थायी समितीने व सभागृहाने मंजुरी दिलेली कामे या दोघांच्या संमतीशिवाय थांबविता येणार नाही.अर्थसंकल्प तयार करताना पेंडन्सीची मागील अनेक वर्षांची महापालिकेची परंपरा आहे. प्रशासनानेच यातून मार्ग काढावा, अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडली. महापालिकेच्या तिजोरीत विकास कामांसाठी पैसा नाही. फाईल थांबल्या आहेत. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत नासुप्रचे ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर येथील विकास कामे कशी करणार असा सवाल काँग्रेसचे संदीप सहारे यांनी केला. नगरसेवकांच्या प्रलंबित फाईवरील नगरसेवकांच्या भावना विचारात घेता महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर २० फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्याची ग्वाही महापौर संदीप जोशी यांनी दिली.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcommissionerआयुक्तNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका