शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ४० हजार कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:35 IST

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी तब्बल ४० हजार कर्मचारी सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देप्रशासन सज्ज : आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे : जिल्हाधिकारी अश्विन मुदगलजिल्ह्यात एकूण ४३८२ मतदान केंद्रे : रामटेक २३४५, नागपूर २०३७, ८२ मतदान केंद्र संवेदनशील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी तब्बल ४० हजार कर्मचारी सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तत्काळ प्रभावाने नागपूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व राजकीय पक्ष, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था तसेच प्रशासकीय नियंत्रणाखालील महामंडळे, सार्वजनिक उपक्रम आदींना निर्देश जारी करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामात २८ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ५ ते ६ हजार कर्मचारी इतर कामांसाठी लागतात. अशी एकूण ३५ ते ३६ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहेत. प्रत्यक्षात ४० हजार कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक ओला, नासुप्र सभापती शीतल उगले, सीईओ संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.नामांकन अर्ज दाखल करण्याचीनामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ मार्चपासूनलोकसभा निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनी दिली.नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रात मतदानासाठी ४३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात रामटेक मतदारसंघात २३४५ तर नागपूर मतदारसंघात २०३७ मतदार केंद्रे आहेत. यापैकी ८२ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. यात ५२ केंद्रे शहरात तर ३० केंद्रे रामटेक लोकसभा मतदार संघात आहेत. या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त किंवा सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.असा आहे कार्यक्रम

  • १८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात
  • २५ मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
  • २६ मार्चला अर्जाची छाननी
  • २८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल
  • ११ एप्रिलला मतदान
  • २३ मे रोजी मतमोजणी

नागपूर लोकसभा : विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार केंद्राची संख्यादक्षिण- पश्चिम - ३७२दक्षिण नागपूर - ३४४पूर्व नागपूर - ३३४मध्य नागपूर - ३०५पश्चिम नागपूर - ३३१उत्तर नागपूर - ३५१रामटेक लोकसभा : विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रांची संख्याकाटोल - ३२८सावनेर - ३६४हिंगणा - ४३३उमरेड - ३८३कामठी - ४८०रामटेक - ३५७कायदा व सुव्यवस्थेसाठी नऊ हजारावर पोलीस कर्मचारी तैनात : भूषणकुमार उपाध्यायलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल ८ ते ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी, १ हजार पोलीस अधिकारी, १५०० होमगार्ड तैनात राहतील. यासोबतच सीआरपीएफच्या दोन कंपनीही देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात फ्लॅग मार्च काढण्यात येईल. निवडणुकीमध्ये जी असामाजिक तत्त्वांची मंडळी गडबड करू शकतात अशा लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. यासोबतच इतर संवेदनशील लोकांविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. वॉण्टेड लोकांची यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. तसेच गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.१२५ ठिकाणी अचानक होणार नाकेबंदीनागपुरातील १२५ ठिकाणे अशी निश्चित करण्यात आली आहेत. जिथे वाहतूक आणि पोलीस विभाग मिळून अचानक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करतील. जेणेकरून दारूचा साठा किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही अवैध कृत्य होऊ नयेत.नागपूर सीमेवर अतिरिक्त सुरक्षा पथकनागपूर जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील लोक इकडे येता कामा नये, यासाठी सीमवेर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येईल. तसेच विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असून १३ तारखेला दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nagpurनागपूर