शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मनोरुग्णालयात २० दिवसात ४ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:04 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ४ रुग्णांचा गेल्या २० दिवसात मृत्यू झाला आहे. रु ग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देरुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली : वैद्यकीय सुविधा नसल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ४ रुग्णांचा गेल्या २० दिवसात मृत्यू झाला आहे. रु ग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. सूत्रांच्या मते, प्रत्येक महिन्यात दोन रुग्णाचा मृत्यू होत आहे. त्यामुळे वर्षभरात मृत्यूचा आकडा २४ ते २६ झाला आहे. याचे कारण रुग्णालयात मेडिसीन फिजिशियन नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी आरोग्य उपसंचालकांनी येथे प्रतिनियुक्तीवर एका फिजिशियनची नियुक्ती केली होती, तरीसुद्धा येथे रुग्णांचा मृत्यू होतच आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीच्या २० तारखेपर्यंत येथे उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर बोट दाखविले जात आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांची देखभाल नीट होत नसल्याची चर्चा आहे तसेच डॉक्टरांची मानसिकतासुद्धा येथे केवळ दीड ते दोन तास काम करण्याची आहे.वैद्यकीय सुविधांचा अभावरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे म्हणाले की, रुग्णालयात फिजिशियनकडून प्राथमिक उपचार केले जातात, परंतु रुग्ण हे वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतात. त्या अनुषंगाने रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. रुग्णाला स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात येते. रुग्णालयात येण्यापूर्वी जर रुग्णाची वैद्यकीय तपासणी झाल्यास त्याच्यावर योग्य उपचार करता येऊ शकतात.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर