शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:14 IST

३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोषी आढळल्यास होणार फौजदारी कारवाई : बचतगटाकडून काढले पोषण आहाराचे काम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. ज्या बचतगटाकडून शाळेला पोषण आहाराचा पुरवठा होत होता. त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आले आहे.हुडकेश्वर रोडवरील मारोतराव मुडे हायस्कूलमध्ये ७ सप्टेंबर रोजी ३२ मुलांना पोषण आहार खाल्याने विषबाधा झाली होती. या मुलांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. शाळेत पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट शगुन महिला बचत गटाला देण्यात आले होते. जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी चार सदस्यीय समिती गठित केली आहे. उपशिक्षणाधिकारी प्रकाश ढवंगळे यांच्या नेतृत्वात गठित करण्यात आलेल्या समितीत लेखाधिकारी मनीष मानमोडे, शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक गौतम गेडाम व सुजाता आगरकर यांचा समावेश आहे. समिती गुरुवारला पोषण आहार तयार करणाऱ्या स्थळाची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचाही बयाण नोंदविणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहाराच्या तपासणीचे नमुने पाठविले आहे. त्यांच्याकडून अद्यापही कोणत्याही प्रकारचा अहवाल आला नाही.

 बचतगटाला यापूर्वी दिल्या होत्या नोटीसया बचतगटाकडून पुरविण्यात येणाऱ्या आहारासंदर्भातील तक्रारी यापूर्वीच प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण गटाकडून सातत्याने निष्काळजीपणा होत असल्याने अखेर पोषण आहाराने विद्यार्थ्यांच्या आरोग्य बिघडले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी