शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात ४ लाख ३४ हजार कृषीपंप वीज जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:42 IST

राज्य शासनाने नोव्हेंबर २०१४ ते आॅगस्ट २०१८ या काळात राज्यातील ४ लाख ३४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. या कनेक्शनपोटी ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांसाठी ४ १८७ कोटी रुपये खर्च केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी ४ १८७ कोटी खर्च : मुख्यमंत्र्यांकडे झाले ऊर्जा विभागाचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने नोव्हेंबर २०१४ ते आॅगस्ट २०१८ या काळात राज्यातील ४ लाख ३४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. या कनेक्शनपोटी ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांसाठी ४ १८७ कोटी रुपये खर्च केले.मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यासमोर ऊर्जा विभागाने नुकतेच प्रमुख कामांचे सादरीकरण केले. या सादरीकरणासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागाच्या कामाचे कौतुक केले. गडचिरोली, चंद्र्रपूर, ठाणे व रायगड या चार जिल्ह्यातील कृषीपंप वीज जोडणीचा अनुशेष याच सरकारने पूर्ण केला आहे. नोव्हेंबर २०१४-१५ मध्ये ६२ हजार ६५०, २०१५-१६ मध्ये १ लाख ३० हजार, २०१६-१७ मध्ये १ लाख २५ हजार, २०१७-१८ मध्ये ६६ हजार १७४ आणि २०१८ आॅगस्ट अखेरपर्यंत ४९ हजार ९५८ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. कृषी पंपांना यापुढे उच्च दाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यासाठी नवीन योजना मे १८ मध्ये जाहीर करण्यात आली.वीजनिर्मिती क्षमतेत वाढगेल्या चार वर्षाच्या काळात महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेत वाढ करण्यात आली. सन २०१४-१५ मध्ये ५० मेगावॅट वीजनिर्मितीचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आले. शिरसुफळ (बारामती) ३६.३३ मेगावॅट आणि १४ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प अनुक्रमे १९ डिसेंबर २०१४ आणि ३१ मार्च २०१५ ला कार्यान्वित झाले. सन २०१५-१६ मध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प ६६० मेगावॅटचे कोराडी येथे १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये कार्यान्वित झाला. सन २०१६-१७ मध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प २५७० मेगावॅट, चंद्र्रपूर संच ८ (५०० मेगावॅट) ४ जून २०१६ रोजी, परळी संच क्रमांक ८ - २५० मेगावॅट १९ नोव्हेंबर २०१६ रोजी आणि कोराडी संच क्रमांक ९ - ६६० मेगावॅट २२ नोव्हेंबर २०१६ रोजी, चंद्र्रपूर येथे संच क्रमांक ९ (५०० मेगावॅट) २४ नोव्हेंबर २०१६ रोजी आणि कोराडी संच क्रमांक १० (६६०) मेगावॅट १७ जानेवारी २०१७ रोजी कार्यान्वित झाले.भारनियमनमुक्त महाराष्ट्रसन २०१४ ते २०१७ या कालावधीत वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॅट वाढ झाल्यामुळे राज्यात सर्व भागात अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित राहू शकतो पण भारनियमन म्हणून कुठेही वीजपुरवठा खंडित होत नाही, अशी माहिती या सादरीकरणातून मुख्यमंत्र्यांना ऊर्जा विभागाने दिली. मार्च २०१७ अखेर राज्यातील ४१ हजार ९२८ गावांपैकी १११ गावे विद्युतीकरण करावयाची शिल्लक होती. यापैकी सर्व गावांचे विद्युतीकरण मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आले. केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१७ मध्ये सौभाग्य योजना जाहीर केली. त्यावेळी राज्यात ७ लाख ५८ हजार ७३० इतक्या घरांना वीज जोडणे देणे शिल्लक होते. यापैकी ६ लाख ३५ हजार ४४९ घरांना वीज जोडणी देण्यात आली. १ लाख २३ हजार २८१ घरांना वीज जोडणी देणे शिल्लक असून ती डिसेंबर २०१८ पर्यंत देण्याचे ऊर्जा विभागाचे प्रयत्न आहेत.औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलतविदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व डी आणि डी प्लस क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना १ एप्रिल २०१६ पासून वीज दरात सवलत देण्यात आहे. ३ लाख २० हजार ग्राहकांना सुमारे दोन हजार कोटींची सवलत देण्यात आली. दोन वर्षात १५ हजारावर नवीन औद्योगिक ग्राहक आले आहेत.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत कृषी फिडरद्वारे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यात राळेगणसिध्दी (जि. अहमदनगर) व कोळंबी (जि. यवतमाळ) या ठिकाणी प्रत्येकी २ मेगावॅट क्षमतेचे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पाचा फायदा १८११ आणि ६०५ कृषी ग्राहकांना होणार आहे. महानिर्मितीचे २०० मेगावॅटचे ४१ प्रकल्प डिसेंबर २०१८ पर्यंत, ३०० मेगावॅटचे ६७ प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत, महावितरणचे ५०४ मेगावॅटचे प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होतील. महावितरणचे २३५ मेगावॅटचे प्रकल्प ३१ जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांमधील वीज स्वस्त मिळणार असल्याने शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या क्रास सबसिडीची बचत होणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज