शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

३८ टक्के मातामृत्यूला रक्तस्राव कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 11:57 IST

गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत या कारणांमुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे.

ठळक मुद्देबालमृत्यू दर हजारात २९ बालरोग व स्त्रीरोग तज्ज्ञाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत या कारणांमुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे, ३८ टक्के मातामृत्यू केवळ अतिरक्तस्रावाने होतात. नवजात बालमृत्यूचा दर हजारामागे २९ एवढा आहे. २०१२ च्या तुलनेत दोन्ही आकडेवारी कमी असल्यातरी बळीची संख्या आणखी कमी करण्याच्या दृष्टीने ‘नार्चिकॉन-२०१८’ ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ व या परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर यांनी पत्रपरिषदेत दिली.याप्रसंगी परिषदेच्या आयोजक अध्यक्ष डॉ. निर्मला वझे, सचिव डॉ. प्रगती खळतकर, डॉ. क्षमा केदार, डॉ. निशिकांत कोतवाल, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. पौर्णिमा करंदीकर, डॉ. अलका मुखर्जी, डॉ. सुषमा देशमुख आदी उपस्थित होत्या.डॉ. वसंत खळतकर म्हणाले, शिशुमृत्यूदराचे प्रमाण हजारामागे ४१, तर पाच वर्षाच्या आतील मुलांचा मृत्यूदर हजारामागे ५२ एवढा आहे. महाराष्टÑात एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८या दहा महिन्यात १३५०० बालकांचा मृत्यू झाला आहे. बालमृत्यूमागे अनेक कारणे आहेत. यावर चर्चा व मार्गदर्शनासाठी ‘नॅशनल असोसिएशन आॅफ रिप्रोडक्टीव्ह अ‍ॅण्ड चाईल्ड हेल्थ आॅफ इंडिया’ नागपूर शाखा व ‘एम.के.पी. साळवे आयुर्विज्ञान संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ पासून तीन दिवसीय १४ व्या जागतिक भारतीय ‘नार्चिकॉन-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रगती खळतकर म्हणाल्या, राज्यात २००३ मध्ये एक लाखामागे ३०१ मातामृत्यू दर होता. २०१२ मध्ये हेच प्रमाण १७० तर २०१८ मध्ये हे प्रमाण १२०वर आले आहे.या वर्षी हे प्रमाण १००वर आणण्याचे लक्ष्य आहे. माता मृत्यूसाठी संसर्गमोठे कारण ठरते. यात मृत्यूचे प्रमाण ११ टक्केआहे, उच्चरक्तदाबामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण ५ टक्के, विविध गुंतागुंतीमुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण ८ टक्के आहे.गर्भपात मृत्यूचे प्रमाण ५ टक्केनुकतेच सरकारने स्त्रीला नको असलेल्या गर्भपाताला मंजुरी दिली आहे. यामुळे साधारण ९० टक्के गर्भपात वैधपद्धतीने होत आहेत. परंतु आजही ९ ते १० टक्के गर्भपात अवैध पद्धतीने होत असल्याने यात मातामृत्यूचे प्रमाण ५ टक्के आहे. जनजागृती व तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचाराने हा दरही टाळता येऊ शकतो, असे मतही तज्ज्ञानी मांडले. संचालन डॉ. देशमुख यांनी केले तर आभार प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी मानले.

टॅग्स :Deathमृत्यू