शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज्यातील कुटुंब न्यायालयांत ३७ हजारावर तक्रारी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:23 IST

‘नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड’वरील आकडेवारीनुसार राज्यातील कुटुंब न्यायालयांत आजघडीला ३७ हजारावर तक्रारी प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देदिवाणी २८, फौजदारी ९ हजारावर तक्रारी

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड’वरील आकडेवारीनुसार राज्यातील कुटुंब न्यायालयांत आजघडीला ३७ हजारावर तक्रारी प्रलंबित आहेत. त्यात २८ हजारावर दिवाणी व ९ हजारावर फौजदारी तक्रारींचा समावेश आहे.राज्यामध्ये मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर व ठाणे येथे कुटुंब न्यायालये कार्यरत असून या ठिकाणी १० ते २० वर्षापासून १८, पाच ते दहा वर्षापासून ६८८, तीन ते पाच वर्षापासून ३ हजार २१७, एक ते तीन वर्षापासून १२ हजार ४०८ तर, एक वर्षापेक्षा कमी कालावधीतील २१ हजार ४४२ तक्रारी प्रलंबित आहेत. घटस्फोट, पोटगी, अपत्याचा ताबा, रहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे, मालमत्ता विक्रीवर मनाई हुकूम मिळविणे इत्यादी वैवाहिक अधिकारांसाठी या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

महिलांच्या १९ हजारावर तक्रारीएकूण तक्रारींमध्ये महिलांच्या ११ हजार ४१७ दिवाणी व ८ हजार ५६५ फौजदारी अशा एकूण १९ हजार ९८२ तक्रारींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ६३६ (२७७ दिवाणी व ३५९ फौजदारी) तक्रारी आहेत.म्हणून तक्रारी वाढत आहेतस्वत:बद्दलचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करणे, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, एकमेकांच्या नातेवाईकांचा अनादर करणे इत्यादी कारणांमुळे कौटुंबिक तक्रारी वाढत आहेत अशी माहिती कुटुंब न्यायालयातील जाणकारांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालय