शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आयसीयू बेडअभावी तब्बल ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 03:01 IST

नागपूरमधील वास्तव

सुमेध वाघमारे 

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरूच आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीनंतरही कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले नाही. एकट्या एप्रिल महिन्यात आयसीयू बेडअभावी ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रुग्णालयात (मेडिकल) ऑक्सिजनच्या ४०० खाटा वाढवून १००० होणार होत्या. परंतु कोणीही गांभीर्याने घेतले नाही. सध्या मेडिकलमध्ये २४५, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ९० तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत सुमारे १५ आयसीयू बेड आहेत. शासकीय रुग्णालयात केवळ ३५० आयसीयू बेडची व्यवस्था आहे. परिणामी, १ ते २७ एप्रिलदरम्यान ‘एचडीयू’ वॉर्डात ३६५ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. 

कॅज्युअल्टीमधील मृत्यूला जबाबदार कोण?मेडिकलमध्ये एप्रिल महिन्याच्या २७ तारखेपर्यंत ९८७ बाधितांचे मृत्यू झाले. यातील आयसीयूमध्ये ४८५ रुग्णांचे जीव गेले. धक्कादायक म्हणजे, उपचारासाठी आलेल्या १२८ रुग्णांचा मृत्यू कॅज्युअल्टीमध्ये झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

धक्कादायक आकडेवारीविभाग    मृत्यू    टक्केवारीआयसीयू    ४८५    ३९.५९%कॅज्युअल्टी    १२८    १०.४५%प्रिसम्पटिव्ह    ०९    ०.७३%एचडीयू    ३६५    २९.८०%ब्रॉट डेड    २३८    १९.४३%

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू