शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉस मशीनमुळे ३.६४ मेट्रिक टन धान्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:26 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावी, यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आली आहे. या ई-पॉसमुळे लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे ३.६४ मेट्रिक टनाहून अधिक धान्याची बचत झाली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावी, यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आली आहे. या ई-पॉसमुळे लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे ३.६४ मेट्रिक टनाहून अधिक धान्याची बचत झाली आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. ई-पॉस मशीनद्वारे केरोसीनचे सुद्धा वाटप केले जात आहे. त्यामुळे सुमारे ६० टक्क्यांपर्यंत केरोसीनची बचत झाली आहे. दरमहा सव्वाकोटी कुटुंब आधार प्रमाणिकरण करून धान्य उचल करीत असल्यामुळे विक्री व्यवहार पारदर्शक झाले आहेत. या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना राज्यातील कोणत्याही धान्य दुकानातून धान्य घेण्याची सुविधा पोर्टबिलिटीमुळे शक्य झाली आहे. ई-पॉस मशीनवरील विक्री व्यवहार mahafood.gov.in संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध असल्याने, विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत झाली असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.ई-पॉसमुळे काळाबाजार रोखण्यास मदत होण्याबरोबरच रेशन दुकानदारांना उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. सर्व शिधापत्रिका या आधार कार्डशी जोडण्यात आल्यामुळे, पात्र लाभार्थ्यांंना नियमित धान्य मिळू लागले आहे. जून २०१७ पासून सर्व रास्त भाव दुकानांतून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात असून, १ मे २०१८ पासून आधार प्रमाणिकरण करूनच धान्य वितरण केले जात असल्याचे यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर