शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण : मृत्यूचा आकडा गेला ३९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:33 AM

जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण आढळून आले असून, मृत्यूचा आकडा ३९ वर गेला आहे.

ठळक मुद्दे नागपूर जिल्ह्यात २४८ रुग्णांची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण आढळून आले असून, मृत्यूचा आकडा ३९ वर गेला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. रुग्णांची संख्या २४८ वर पोहचली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लोकांना सतर्क राहण्याचे व सर्दी, घशात खवखव आणि ताप असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.बदलत्या वातावरणाचा परिणाम शरीरावर होऊ लागला आहे. सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हीच लक्षणे स्वाईन फ्लूची आहेत. परंतु अनेक जण याला सुरुवातीलाच गंभीरतेने घेत नाही. जेव्हा आजाराची गुंतागुंत वाढते तेव्हाच रुग्ण डॉक्टरांकडे जातात. सध्या स्वाईन फ्लूचा जोर कमी असला तरी पाऊस लांबणार असल्याने सतर्क राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.उपलब्ध माहितीनुसार, १ जानेवारी ते २० ऑगस्ट २०१९ पर्यंत नागपूर शहरात २२४, ग्रामीणमध्ये २४, वर्धा जिल्ह्यात पाच, गोंदिया जिल्हात पाच, भंडारा जिल्ह्यात चार, गडचिरोली जिल्ह्यात तीन, चंद्रपूर जिल्ह्यात १०, अमरावती जिल्ह्यात ३०, अकोला जिल्ह्यात चार, यवतमाळ जिल्ह्यात तीन, बुलडाणा जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, इतर राज्यातून नागपुरात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ४२ आहे. यात मध्य प्रदेशातील ४०, पश्चिम बंगालमधील एक व दिल्ली येथील एक रुग्ण आहे. जुलै महिन्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात नागपुरात एका रुग्णाची नोंद झाली आहे. वातावरणातील बदलांमुळे स्वाईन फ्लू वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नागपूर जिल्ह्यात २५ मृत्यूगेल्या आठ महिन्यात नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने २५ बळी घेतले आहे. यात नागपूर शहरातील २० तर ग्रामीण भागातील पाच आहेत. भंडारा जिल्ह्यात एक, चंद्रपूर जिल्ह्यात चार, अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात एक, अकोल जिल्ह्यात एक, मुंबई जिल्ह्यात एक अशी एकूण ३९ मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयDeathमृत्यू