शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  तासाभरात पकडले वाळू माफियाचे ३६ टिप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:20 IST

झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांनी गुरुवारी रात्री उमरेड रोडवर रेती आणि गिट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम चालवित तासाभरात ३६ टिप्पर पकडले. या करवाईमुळे वाळू आणि खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देडीसीपी भरणे यांची व्यापक मोहीम : महसूल विभागाची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांनी गुरुवारी रात्री उमरेड रोडवर रेती आणि गिट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम चालवित तासाभरात ३६ टिप्पर पकडले. या करवाईमुळे वाळू आणि खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे.डीसीपी भरणे यांनी हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने यांच्या मदतीने रात्री ११ वाजता उमरेड रोडवरील आऊटर रिंंगरोडवर मोहीम राबवली. तासाभरातच गिट्टी व रेतीने भरलेल्या अनेक वाहनांना थांबवून पोलिसांनी त्यांच्या दस्तऐवजाची तपासणी केली. प्राथमिक तपासात पोलिसांना अनेक वाहनांच्या रॉयल्टी दस्तावेजात गडबड असल्याचे आढळून आले. भरणे यांनी तहसीलदार आणि नायब तहसीलदारांशी मोबाईवर संपर्क साधला. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने वाहनांना ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी स्थानिक प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी भरणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना कारवाईची माहिती देण्यात आली. तेव्हा ग्रामीण परिसराचे नायब तहसीलदार बमनोटे यांना चौकशीसाठी पाठवण्यात आले.उमरेड रोडने दरदिवशी रेती, गिट्टी आणि मुरुम घेऊन शेकडो वाहने ये-जा करतात. स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मदतीने अवैध वाहतूक होत असते. या धंद्यात लाखो रुपयांचे वारे-न्यारे होतात. त्यामुळे हा धंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आठ महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी या अवैध धंद्याबाबत ठाणेदारांना सुनावले होते. तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान वाळू माफियांनी महसूल विभागाच्या अधिकाºयांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.मंडळ अधिकारी आर.एच. बमनोटे यांनी सांगितले की, पोलिसांनी ३६ वाहने पकडली आहे. यापैकी १६ वाहनांकडे जुनी रॉयल्टी होती. त्यांचे प्रकरण तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ते उद्या कारवाईचा निर्णय घेतील. ही कारवाई डीसीपी नीलेश भरणे, एसीपी रवींद्र कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान माने, एपीआय कदम, पीएसआय सहरे, वडोदे, राठोड आदींनी केली.नेत्यांचा आश्रयवाळू माफियांना नेत्यांचा आश्रय मिळालेला आहे. त्यांच्याशी जुळलेले अनेक नेते राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईनंतरही वाळू माफियांना कुठलाही फरक पडत नाही.

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिस