शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गाईच्या पोटातून निघाल्या ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:17 IST

प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. मात्र कचऱ्यात पडलेल्या या पिशव्या मुक्या जनावरांसाठी जीवघेण्या ठरत आहे. अत्यवस्थ स्थितीत अंबाझरी परिसरात पडलेल्या एका गाईच्या पोटातून ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या, लोखंडाचे नटबोल्ट, नॉयलॉन मांजा, चप्पलचे तुकडे आदी काढण्यात आले. गाय सात महिन्याची गर्भवती सुद्धा होती. अतिशय कठीण ही सर्जरी होती. मनपाच्या भांडेवाडी येथील पशु निवारा केंद्रात पशुचिकित्सक डॉ. मयूर काटे यांनी गाईचे ऑपरेशन केले. ऑपरेशन यशस्वी ठरले. तिच्या पोटात बऱ्याच काळापासून प्लास्टिकच्या पिशव्या जमा होत्या.

ठळक मुद्देमनपाच्या पशु अधिकाऱ्यांनी केली सर्जरी : पोटातून खिळे, नटबोल्टही निघाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. मात्र कचऱ्यात पडलेल्या या पिशव्या मुक्या जनावरांसाठी जीवघेण्या ठरत आहे. अत्यवस्थ स्थितीत अंबाझरी परिसरात पडलेल्या एका गाईच्या पोटातून ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या, लोखंडाचे नटबोल्ट, नॉयलॉन मांजा, चप्पलचे तुकडे आदी काढण्यात आले. गाय सात महिन्याची गर्भवती सुद्धा होती. अतिशय कठीण ही सर्जरी होती. मनपाच्या भांडेवाडी येथील पशु निवारा केंद्रात पशुचिकित्सक डॉ. मयूर काटे यांनी गाईचे ऑपरेशन केले. ऑपरेशन यशस्वी ठरले. तिच्या पोटात बऱ्याच काळापासून प्लास्टिकच्या पिशव्या जमा होत्या.मौंदे नावाच्या व्यक्तीचीही ही गाय होती. तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता. तिने खाणे बंद केले होते. पोट सुद्धा फुगले होते. डॉ. काटे यांनी तिच्यावर उपचार केले. औषध आणि इंजेक्शन दिल्यावर काही काळ ती बरी रहायची. नंतर परत ती बिमार पडायची. अखेर गायीचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. डॉ. काटे यांनी ऑपरेशन करायला सुरुवात केल्यानंतर आतड्यांमध्ये प्लास्टिक फसले होते. बरोबरच लोखंडी खिळे, नटबोल्ट सह अनेक वस्तू निघाल्या. पोटातील आतड्या साफ करून सर्जरी पूर्ण केली. या ऑपरेशन नंतर गाय कमजोर झाली आहे. तिला निरोगी करण्यासाठी औषध व खाद्य पदार्थ दिले जात आहे. मुक्या जनावरांचे प्लास्टिकचे होत असलेले आघात लक्षात घेता, नागरिकांनी जागरुक होणे गरजेचे आहे.अनेक जनावर उपचाराअभावी मृत्यू पावतातसाधारणत: प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात फेकल्या जातात. मुक्या जनावरांच्या त्या खाण्यात येतात. त्यामुळे ते आजारी पडतात. नुकताच एक वळू गोरक्षण सभेतून उपचारासाठी आला होता. त्याच्या पोटातून ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्या होत्या.मुक्या जनावरांना मरणास सोडू नका : डॉ. काटेडॉ. मयुर काटे यांनी सांगितले की, मनपातर्फे भांडेवाडीत पशुनिवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे मुक्या प्राण्यांवर उपचार करण्यात येतो. त्यामुळे मुक्या प्राण्यांना मरण्यास सोडू नका, त्यांना केंद्रात उपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अंबाझरी परिसरातील या गाईचे पोट फुगले होते. १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. ती बरी होत नसल्याने तिच्यावर सर्जरी करण्यात आली. वेळेतच सर्जरी झाली नसती तर तिचा मृत्यू झाला असता. त्यामुळे आजारी जनावर आढळल्यास त्याला उपचार उपलब्ध करून देणे नागरिकांचे कर्तव्य आहे.प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करू नका !मनपाचे मुख्य पशु चिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, गाय व वळू यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्राण्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही फेकू नका.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीcowगाय