शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:09 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

ठळक मुद्दे५३ दुकानदारांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंढे म्हणाले, जमावबंदी काळात लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले केले आहे. नागरिकांनी अनावश्यक रोडवर येऊ नये. महत्वाचे काम असेल तरच, त्याचा विचार या कायात केला जाईल. नागरिक या आवाहनाला चांगली साथ देत आहेत. नागपुरातील ९० टक्के लोक आज रोडवर नाहीत. प्रवासासाठी रेल्वे, बस, ऑटो सुविधा अद्यापही सुरू आहेत. मात्र अशातही कायदा मोडणाऱ्या ३४८ लोकांना डिटेक्ट केले आहे. ता सर्वांना दोन ते तीन तास थांबवून ठेवले. ६८ अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई करून नंतर सोडण्यात आले. या काळात दुकाने सुरू ठेवणाºया ५३ दुकानदारांवरही कलम १८८ नुसार शनिवारी कारवाई करण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. शहरातील ९८ टक्के लोक सहकार्य करीत आहे. अनावश्यक कुणी बाहेर पडत असतील, तर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.मनीषनगरातील ‘त्या’ व्यक्तीची दखलबजाजजनगर, मनिषनगर परिसरात संशयीय रूग्ण असलेल्यापैकी एक व्यक्ती सर्रासपणे फिरत असून जनतेत मिसळतो. त्यामुळे नागरिक धास्तावल्याचे यावेळी पत्रकारांनी पालकमंत्री आणि आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्या संदर्भातील कारवाईची माहिती देताना मुंढे म्हणाले, आमचे अधिकारी आणि डॉक्टर्स अशा दोन व्यक्तीपर्यंत गेले होते. त्यापैकी एकाला यापूर्वी कॉरेन्टाईन केले होते. मात्र तो प्रवासी प्रशासनाला सहकार्य करत नव्हता. दोघांपैकी एकाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेऊन कॉरेन्टाईन केले आहे. आज सकाळी दुसऱ्याला होम कॉरेन्टाईन केले आहे. प्रशासनाचे लक्ष नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. संबंधिताला यापूर्वीच होम कॉरेन्टाईन केले होते. परंतु त्याने सूचना पाळल्या नाही. ती तक्रार आमच्यापर्यंत आल्यावर दखल घेतली. जनतेला आम्ही हेल्प लाईनचा नंबर दिला आहे. परिसरात कोणी संशयीत असतील, घराबाहेर पडत असतील, तर कळवा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढेMediaमाध्यमे