शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

विदर्भात २८ कोटींच्या ३,४७० वीजचोऱ्या उघडकीस; भरारी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:30 IST

Nagpur : अकोला परिमंडलात सर्वाधिक वीजचोऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या अंतर्गत नागपूर प्रादेशिक विभागातील भरारी पथकांनी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षात विदर्भातील ११,१०२ ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी केली. यात २८ कोटी ४४ लाख रुपये मूल्याच्या तब्बल ३,४७० वीजचोऱ्या उघड झाल्या.

या भरारी पथकांनी वीजचोरी करणाऱ्या विदर्भातील या ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ (सुधारित २००७) च्या कलम १३५ अन्वये कारवाई केली. विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ अन्वये व इतर १,७८८ प्रकरणांमध्ये १७ कोटी ७९ लाख रुपयांची अनियमितता आढळली. या कालावधीत वीजचोरी आणि अनियमिततेपोटी एकूण ४६ कोटी २४ लाख रुपये रकमेचे निर्धारण करण्यात आले आणि त्यापैकी ३९ कोटी ८९ लाख रुपये संबंधित ग्राहकांकडून वसूल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, वीजचोरीची रक्कम न भरलेल्या ग्राहकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये २८८ वीज ग्राहकांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकोला परिमंडलात सर्वाधिक वीजचोऱ्या

  • अकोला परिमंडलात सर्वाधिक १५.८१ कोटी रुपयांच्या १,०२४ वीजचोऱ्या, ६ अनियमितता आणि ४७२ इतर प्रकरणे उघडकीस आली.
  • नागपूर परिमंडलात १४.१४ कोटी रुपयांच्या ८१५ वीजचोऱ्या, ४१ अनियमितता आणि १६१ इतर प्रकरणे उघडकीस आली.
  • अमरावती परिमंडलात ८.७७ कोटींच्या ६७५ वीजचोऱ्या, ७ अनियमितता आणि ५०५ इतर प्रकरणे उघडकीस आली.
  • चंद्रपूर परिमंडलात ४.५२ कोटींच्या ४८९ वीजचोऱ्या, ८ अनियमितता आणि १०७इतर प्रकरणे उघडकीस आली.
  • गोंदीया परिमंडलात १.९७ कोटींच्या ४६७ वीजचोऱ्या, ६ अनियमितता व १६५ इतर प्रकरणे उघडकीस आली.
टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज