शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर ३४.५ किलो गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 21:14 IST

रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री प्लॅटफार्म क्रमांक १ वर ३.४५ लाख रुपये किमतीचा ३४.५ किलो गांजा जप्त करून तीन आरोपींना अटक केली. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला.

ठळक मुद्देतिघांना अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री प्लॅटफार्म क्रमांक १ वर ३.४५ लाख रुपये किमतीचा ३४.५ किलो गांजा जप्त करून तीन आरोपींना अटक केली. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य अर्जुन सामंतराय शुक्रवारी रात्री १.४० वाजता गस्त घालत असताना त्यांना चार बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. बॅगमध्ये स्फोटके असण्याची शक्यता असल्यामुळे बॅगची हँड मेटल डिटेक्टरने तपासणी केली असता त्यात काहीच आढळले नाही. त्यानंतर बॅगची स्कॅनिंग मशिनमध्ये तपासणी केली असता त्यात सात पाकीट असल्याचे आढळले. पाकिटात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्हीत तपासणी केली असता तीन आरोपींनी प्लॅटफार्म क्रमांक ३ वरून येऊन कमसम हॉटेलसमोर बॅग ठेवल्याचे दिसले. सीसीटीव्हीत रात्री ३ वाजता आरोपी प्लॅटफार्म क्रमांक २/३ च्या ब्रिजजवळ बसलेले दिसले. लगेच त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी आपले नाव इंद्रजित बैनामी (३०), रोहतास किसनलाल (२५) रा. अलिगड आणि दिगंबर अमरसिंह (३०) रा. मधुरा सांगितले. दुर्गवरून नागपूरला आल्याचे सांगून येथून मथुरा येथे जाणार होते, असे त्यांनी सांगितले. आरोपींना मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरraidधाड