शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी फरार असल्यामुळे ३३४९ खटले प्रलंबित : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 22:11 IST

आरोपी फरार असल्यामुळे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये ३३४९ खटले प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

ठळक मुद्दे१९४० खटल्यांत अजामीनपात्र वॉरन्ट जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोपी फरार असल्यामुळे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये ३३४९ खटले प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, ३३४९ पैकी १९४० खटल्यांतील आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट तर, ११६८ खटल्यांतील आरोपींविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आला आहे. तसेच, उर्वरित २४१ खटल्यांतील आरोपींविरुद्ध घोषणापत्र जारी करण्यात आले आहे. या आरोपींना न्यायालयासमक्ष हजर करण्यासाठी शहरातील सर्व पाचही झोनमध्ये विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकाच्या कार्यावर लक्ष ठेवणे व आकडेवारी संकलित करण्याकरिता वरिष्ठ पोलीस अधिकारी ललित वर्टीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यासंदर्भात उच्च न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. गेल्या २६ जून रोजी न्यायालयाने प्रलंबित खटले तातडीने निकाली निघावेत याकरिता फरार गुन्हेगारांना शोधून त्यांना संबंधित फौजदारी न्यायालयात हजर करण्यासाठी विशेष पोलीस पथके स्थापन करण्याचा आदेश दिला होता. शहर पोलीस आयुक्तालयाने त्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.समाजाला गुन्हेगारीमुक्त ठेवणे सरकारचे कर्तव्यगुन्हेगारांना योग्यवेळी गजाआड करणे आवश्यक असते. अन्यथा समाजातील कायदा, सुव्यवस्था व सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. गुन्हेगार अधिक काळापर्यंत मोकळे राहिल्यास त्यांचे धाडस वाढते. ते पुन्हा नवनवीन गुन्हे करतात. परिणामी, यासंदर्भात तातडीने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. समाजाला गुन्हेगारीमुक्त ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे असे न्यायालयाने गेल्या आदेशात म्हटले होते.ग्रामीणमध्ये ४१७ खटले प्रलंबितआरोपी फरार असल्यामुळे नागपूर ग्रामीणमध्ये ४१७ खटले प्रलंबित होते. त्यापैकी पाच आरोपींना अटक करून संबंधित न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी जिल्ह्यातील उपविभागस्तरावर पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत.

टॅग्स :High Alertहाय अलर्टnagpurनागपूर