शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

३२.७६ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:09 AM

- जीएसटी गुप्तचर संचालनालयाची कारवाई : दोन संचालकांना अटक नागपूर : बोगस बिल तयार करून खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची ...

- जीएसटी गुप्तचर संचालनालयाची कारवाई : दोन संचालकांना अटक

नागपूर : बोगस बिल तयार करून खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल करणारे उद्योजक आणि व्यावसायिकांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेेअंतर्गत केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) औरंगाबाद क्षेत्रीय युनिटने एमएस वेस्ट/स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या एका फर्मच्या दोन संचालकावर धाड टाकून अटक केली.

दोन्ही संचालकाने फर्मच्या माध्यमातून बोगस पावत्याद्वारे १७०.३५ कोटींचा व्यवहार करून ३२.७६ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतला. दोन्ही संचालकांनी कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता बोगस बिलाच्या आधारावर खोटे आयकर विवरण दाखल केले आहे. या संदर्भात डीजीजीआयच्या औरंगाबाद क्षेत्रीय युनिटने ३ आणि ४ डिसेंबरला विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत व्यवहाराच्या विविध नोंदी असलेली डायरी आणि शीट ताब्यात घेतल्या. खोटा व्यवहार करून ५ टक्के जीएसटी रेट अर्थात दोन्ही बाजूने २.५ टक्के कमिशन घेतल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले. अशा प्रकारे या दोन्ही करदात्यांनी हजारो व्यवहार केले आहेत. चौकशीदरम्यान करदात्यांनी खोटे व्यवहार केल्याचे कबूल केले. कमिशन रकमेच्या बँक पेमेंटच्या आधारावर खोट्या व्यवहाराचा शोध घेण्यात येत आहे. करदात्यांनी बोगस पावत्यांच्या आधारे १८.६६ कोटी आणि १४.१० कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे चौकशीत आढळून आले. यानुसार करदात्याने सीजीएसटी कायदा २०१७ चे उल्लंघन केले आहे.

दोन्ही संचालकांना ४ डिसेंबरला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी दोघांनाही १९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.