शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ‘ब्रॉड डेड’चे ३२० प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:24 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मे २०२० ते १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकट्या मेडिकलमध्ये ३२० अशी प्रकरणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोरोनाचे ४२५३ बळी गेले. यात ‘ब्रॉड डेड’ची टक्केवारी ७.५२ टक्के एवढी आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गाला मार्च महिन्यापासून सुरुवात झाली. मेडिकलमध्ये मे महिन्यात पहिल्यांदाच मृत होऊन आलेल्या (ब्रॉड डेड) रुग्णाची तपासणी केल्यावर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अशी प्रकरणे वाढत गेली. जुलै महिन्यात ४, ऑगस्ट महिन्यात ८४, सप्टेंबर महिन्यात ११७, ऑक्टोबर महिन्यात ६६, नोव्हेंबर महिन्यात २२, डिसेंबर महिन्यात १६, जानेवारी महिन्यात ५ तर १८ फेब्रुवारीपर्यंत ५ ‘ब्रॉड डेड’ रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित मृतदेहाचे शवविच्छेदन करू नये, असे ‘आयसीएमआर’चे निर्देश आहेत. यामुळे मृतदेह थेट महानगरपालिकेच्या हवाली करून त्यावर अंत्यसंस्कार केले जात आहे. बाधित मृतदेहाचे शवविच्छेदन होत नसल्याने वैद्यकीय तज्ज्ञाना मृत्यूमागील कारणांचा शोध घेणेही अवघड झाले आहे.

- ४० ते ७० वयोगटातील संख्या अधिक

मेडिकलमध्ये दहा महिन्यात ४० ते ७० वयोगटातील कोरोनाबाधित ‘ब्रॉड डेड’ची संख्या मोठी आहे. धक्कादायक म्हणजे, ग्रामीण किंवा इतर राज्याच्या तुलनेत नागपूर शहरातील संख्या वाढल्याचेही सामोर आले आहे. यावरून महानगरपालिका घरोघरी जाऊन सर्व्हे करीत नसल्याचे यावरून दिसून येते.

-ब्रॉड डेड मागील दोन कारण

तज्ज्ञाच्या मते, कोरोनाचा ‘ब्रॉड डेड’ मागील दोन कारणे दिसून येत आहे. पहिले म्हणजे, लक्षणे दिसूनही अनेक रुग्ण घरीच स्वत:हून उपचार घेतात. रुग्णालयात जाण्याचे टाळतात. दोन ते तीन दिवसानंतर प्रकृती गंभीर झाल्यास रुग्णालयात येतात. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला असतो. दुसरे कारण म्हणजे, कोरोनाबाधित रुग्ण शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणीकडे दुर्लक्ष करतात. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तरी त्यांना लक्षणे दिसून येत नाही. जेव्हा ते अचानक कोसळतात तेव्हा रुग्णालयात येतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. याला ‘हॅपी हायपोक्सिया’ म्हणतात.

-ऑक्सिजन अभावी रुग्णवाहिकेतील प्रवासही धोकादायक

कोरोनाबाधित रुग्णांचा एका रुग्णालातून दुसऱ्या रुग्णालयात किंवा घरातून रुग्णालयात येईपर्यंत विना ऑक्सिजन रुग्णवाहिकेतील प्रवासही ‘ब्रॉड डेड’ला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विशेषत: रुग्णवाहिकेतील पाच तासांपेक्षा जास्त प्रवास धोकादायक ठरण्याची अधिक शक्यता असते.

महिना ‘ब्रॉड डेड’

मे १

जून ०

जुलै ४

ऑगस्ट ८४

सप्टेंबर ११७

ऑक्टोबर ६६

नोव्हेंबर २२

डिसेंबर १६

जानेवारी ५

फेब्रुवारी ५

(१८ तारखेपर्यंत)