शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

3,46,119 ग्राहकांवर 309 कोटीचे वीज बील थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 04:50 IST

महावितरणचे वसुली अभियान : वीज पुरवठा खंडित होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील जवळपास एकतृतीयांश वीज ग्राहकांनी अनेक दिवसापासून वीज बिल भरलेलेच नाही. महावितरणनुसार ३ लाख ४६ हजार ११९ वीज ग्राहकांवर तब्बल ३०९.८४ कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे. शहराचाच विचार केला तर शहरात एकूण नऊ लाख ग्राहक आहेत. आता मुख्यालयाच्या निर्देशानुसार मंगळवारपासून थकीत वसुली मोहीम सुरू करण्यात येत आहे. सध्या कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. वीज कर्मचारी थेट थकबाकीदार ग्राहकाशी संपर्क साधून त्यांना वीज बिल भरण्याची विनंती करतील.

लॉकडाऊनदरम्यान वीज मीटर रीडिंग बंद असल्याने बिल प्रक्रिया ठप्प होती, नंतर तीन ते चार महिन्याचे बिल एकाच वेळी पाठविण्यात आले. वीज बिलाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी वाढल्या. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने लोकांनी बिल भरणेच बंद केले.नागपूर शहराचा विचार केल्यास येथील २ लाख ९३ हजार ८३१ ग्राहकांनी २३१.७६ कोटी रुपयाचे बिल भरलेले नाही, तर राज्यभरात सहा हजार कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने मंगळवारपासून राज्यभरात थकीत बिल वसुली मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याअंतर्गत ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांना बिल भरण्याची विनंती केली जाईल. सध्या कनेक्शन कापले जाणार नाही. परंतु थकीत रक्कम कमी न झाल्यास कनेक्शन कापण्याची मोहीमसुद्धा राबविली जाईल. याासाठी शाखा कार्यालय ते परिमंडळ कार्यालयापर्यंत पथक तैनात करण्यात आले आहे.

महालमध्ये सर्वाधिक थकबाकीशहरात महाल, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स व काँग्रेसनगर या चार डिव्हिजनच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. यापैकी काँग्रेसनगर सोडले तर तिन्ही डिव्हिजन वर्षभरापूर्वीपर्यंत फ्रेन्चाईसीच्या अधीन होते. या चारपैकी महाल डिव्हिजन थकबाकीमध्ये सर्वात पुढे आहे.   येथील १ लाख ८ हजार ५५१ ग्राहकांवर ९३.३५ कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे, तर काँग्रेसनगरमध्ये सर्वात कमी थकबाकीदार आहेत. येथे ७७,८६६ ग्राहकांवर ५८.३६ कोटी रुपयाचे बिल थकीत आहे.

कुठे किती थकबाकीडिव्हिजन ग्राहक संख्या थकबाकी (कोटी रुपये)सिव्हिल लाईन्स ९२,६८६ ९७.१३काँग्रेसनगर ७७,८६६ ५८.३६गांधीबाग ६७,०३६ ६०.९९८महाल १,०८,५५१ ९३.३५-------------------------------------एकूण ३,४६,११९ ३०९.८४

टॅग्स :mahavitaranमहावितरण