शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे रुपयांसाठी ३० हजार गमावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 01:25 IST

ऑनलाईन बुक केलेल्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये जास्त असल्याचे लक्षात आल्यामुळे एका तरुणीने कस्टमर केअरमध्ये चौकशी केली. तर सायबर गुन्हेगारांनी तिच्या खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन बुक केलेल्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये जास्त असल्याचे लक्षात आल्यामुळे एका तरुणीने कस्टमर केअरमध्ये चौकशी केली. तर सायबर गुन्हेगारांनी तिच्या खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले. ७ सप्टेंबरच्या सायंकाळी घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.स्मिता बक्षी (वय ५८) यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या एंजल नामक मुलीने अ‍ॅमेझॉनवर १५६१ रुपये किंमत असलेले एक पुस्तक आॅनलाईन बुक केले. काही दिवसानंतर त्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये कमी दिसल्यामुळे एंजेलने कस्टमर केअर सेंटरमध्ये फोन केला. पलीकडून बोलणाऱ्या आरोपीने तुम्हाला तुमची रक्कम परत हवी असेल तर जेवढ्या रुपयांचे पुस्तक आहे तेवढी रक्कम जमा करावी लागेल, असे म्हटले. त्याच्यावर विश्वास ठेवून एंजेलने रक्कम जमा केली. त्यानंतर २,१४५ रुपये गुगल पे ने पाठविले. सायबर गुन्हेगाराने नंतर तिच्या खात्यातून २९ हजार ४३१ रुपये वळते करून घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी फसवणूक तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर