शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी ३०० कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:15 IST

विसर्जनासाठी भाविकांना फिरावे लागणार नाही. ३०० हून अधिक कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था केली जाणार आहे.

ठळक मुद्देअ‍ॅपच्या माध्यमातून माहिती उपलब्ध : १९२ पीओपी मूर्ती दुकानांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवात शहरात जवळपास १५०० सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन होते, तर घरगुती गणेश मूर्तीची संख्या दोन लाखांहून अधिक असते. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील गणेशभक्तांसाठी हायटेक पद्धतीने विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली आहे. विसर्जनाकरिता नागरिकांना त्यांच्या घराजवळचे विसर्जन केंद्र शोधण्यासाठी ‘मोरया’ नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप सुरू केले आहे. त्यामुळे विसर्जनासाठी भाविकांना फिरावे लागणार नाही. ३०० हून अधिक कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था केली जाणार आहे.गणेश विसर्जनासाठी सर्व झोनअंतर्गत सेंट्रींग, स्टील व प्लास्टिक टँकची व्यवस्था केली जाणार आहे तसेच जमिनीत खड्डे तयार करून ३६ विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. पाच विसर्जन कुंड स्थायी स्वरूपाचे तयार करण्यात आले आहेत. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सोनेगाव तलाव आणि अजनी चौक येथे प्रत्येकी एक, हनुमाननगर झोनअंतर्गत बिंझाणी महाविद्यालयाच्या मैदानात एक, गांधीसागर तलाव येथे एक तसेच मंगळवारी झोनअंतर्गत पोलीस लाईन टाकळी येथे एक असे पाच स्थायी स्वरूपाचे विसर्जन कुंड आहेत.स्टीलचे कृत्रिम टँकप्लास्टिकच्या कृत्रिम टँकवर महापालिके ला दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात. प्लास्टिकचे टँक मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होतात. याचा विचार करता महापालिकेने आता स्टीलचे कृत्रिम टँक उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. नाईक तलाव येथे गौरी विसर्जनासाठी कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली. तसेच उदयनगर येथे स्टीलचे कृत्रिम टँक ठेवण्यात आले आहे. शहराच्या इतर भागातही असे टँक उपलब्ध केले जाणार आहे.६९ पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर करवाईनियमाचे उल्लंघन करणाऱ्या पोओपी मूर्ती विके्रत्यांवर गेल्या काही दिवसापासून महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई केली जात आहे. सोमवारी ६९ विक्रेत्यांवर कारवाई करून ५४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात झोननिहाय करण्यात आलेली कारवाई अशी:- लक्ष्मीनगर ३, धरमपेठ १८, धंतोली ६, नेहरूनगर १३, गांधीबाग १, लकडगंज २४, आसीनगर १ तर मंगळवारी झोनमध्ये एका विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. पथकांनी १९२ दुकानांची तपासणी केली.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर