शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत कोरोनाच्या अहवालास ३० तासांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 21:27 IST

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताच शासकीय प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल मिळण्यास २४ ते ३० तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्देखासगीमध्ये ४७ तासानंतर मिळतो अहवालजोखमीच्या गटातील रुग्णांची प्रकृती होत आहे गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व मृतांची संख्या कमी करण्यासाठ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची व लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करून उपचाराखाली आणण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताच शासकीय प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल मिळण्यास २४ ते ३० तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे तर खासगीमध्ये ४८ तासावर वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी जोखमीच्या गटातील रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे.प्रत्येक संशयिताची चाचणी आवश्यक आहे. तसे झाले नाही तर ते इतर लोकांमध्ये राहून कोरोना पसरवत राहतील. यामुळे चाचणी खूप महत्त्वाची आहे. नागपुरात मेयो, मेडिकल, एम्स, नीरी, माफसू व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे मिळून सहा शासकीय प्रयोगशाळेत कोविडची आरटीपीसीआर तपासणी होते. हीच चाचणी करणाऱ्या सुमारे पाचवर खासगी प्रयोगशाळाही आहेत. मेडिकल व मेयोच्या प्रयोगशाळेत रोजचे नमुने तपासण्याची क्षमता प्रत्येकी ७००वर आहे. एम्सची क्षमता ३९०, माफसू, नीरी व विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची क्षमता प्रत्येकी १२५ तर खासगी प्रयोगशाळेची साधारण एवढीच क्षमता आहे. खासगी व शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेतील रोजची क्षमता तीन हजाराच्या घरात असताना त्याच्यावर नमुने येत आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८४३४ चाचण्या झाल्या. यात ५०४५ रॅपिड अ­ॅन्टिजन चाचण्या तर ३३८९ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. परिणामी, प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढत आहे.-खासगीमध्ये दोन दिवसाआड अहवालनागपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळेचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवितात. त्याचा अहवाल येण्यास ४८ तासांचा कालावधी लागत आहे. काही खासगी प्रयोगशाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने त्यांनाही एवढाच उशीर होत आहे, परिणामी काही ठिकाणी दोन दिवसाचा कालावधी लागत आहे.-तपासणी क्षमता वाढविण्याची गरजमेयो, मेडिकल व एम्सच्या प्रयोगशाळेवर स्वत:च्या रुग्णालयातील रुग्णांसोबतच ग्रामीण, महानगरपालिका व इतर जिल्ह्यातून येणाºया नमुन्यांचीही भार आहे. यामुळे माफसू, नीरी व विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.-आरटीपीसीआर चाचणीसाठी कठोर धोरण हवेरॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी जागोजागी होत आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा संपर्कात आलेले नाही तेही भीती पोटी तपासणी करीत आहे. यात निगेटिव्ह आल्यास थेट आरटीपीसीआर करीत आहे. परिणामी, या चाचण्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. रिपीट चाचणीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे या चाचणीसाठी कठोर धोरण आखणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस