शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

३० मिनिटात ३ टोलनाके लुटले

By admin | Updated: October 26, 2016 03:10 IST

वाडी मार्गावर हैदोस घालत अवघ्या ३० मिनिटात ३ टोलनाके लुटणाऱ्या तीन लुटारुंच्या वाडी पोलिसांनी घटनेच्या तासाभरातच मुसक्या बांधल्या.

वाडी-एमआयडीसीत लुटारुंचा हैदोस : तासाभरात पोलिसांनी बांधल्या मुसक्या नागपूर : वाडी मार्गावर हैदोस घालत अवघ्या ३० मिनिटात ३ टोलनाके लुटणाऱ्या तीन लुटारुंच्या वाडी पोलिसांनी घटनेच्या तासाभरातच मुसक्या बांधल्या. प्रिन्स वीरेंद्र सिंग (वय ३०, रा. खडगाव रोड), मोहित पुरुषोत्तम कोठे (वय २०, रा. दत्तवाडी, गजानननगर सोसायटी) आणि सागर संजय मेश्राम (वय २७, रा. हरिओम सोसायटी) अशी या लुटारुंची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वॅगनआर कार (एमएच ४०/ एआर ०१९१) आणि लुटलेली रक्कम जप्त केली.आरोपी प्रिन्स ट्रकचालक आहे. मोहित एका कंपनीत काम करतो. तर, सागर कारपेंटर आहे. हे तिघे सोमवारी रात्रभर दारू पीत होते. मंगळवारी पहाटे २.४० वाजता ते कारमधून दाभा टोल नाक्यावर बूथ क्रमांक एकवर पोहचले. तेथे रोखपाल जितेंद्र केशवराव पाटील (वय ३२, रा. दत्तवाडी) याला मारहाण करीत त्यांनी ४३५० रुपये लुटले. तेथून ते वाडी एमआयडीसीत मार्गावरील टोलनाक्यावर पोहचले. येथे चेतन अशोकराव कारेमोरे (वय १९) या रोखपालाला मारहाण करून धमकी देत ५०० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांनी पहाटे ३ च्या सुमारास बाजूच्या टोलनाक्यावरील (बी-१) कॅश काऊंटर लुटले. येथून ४०५५ रुपये लुटून त्यांनी गौरख हिंमत कोळी (वय २५) याला जिवे मारण्याची धमकी दिली अन् पळ काढला. अवघ्या ३० मिनिटात तीन टोलनाक्यावर लुटमार करण्याच्या घटना घडल्याचे नियंत्रण कक्षात कळाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी ही बाब वाडी पोलिसांना कळविली. यावेळी ठाणेदार भीमराव खंदाळे रात्रगस्तीवर होते. त्यांनी लगेच लुटारुंच्या कारचा नंबर घेत परिसरात शोधाशोध सुरू केली. नमूद वर्णनाची कार खडगांव वळणावरून वाडी अमरावती रोडने जात असल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ वाडी पोलीस ठाण्यात संबंधित मार्गावर नाकाबंदी करण्याच्या सूचना देत पाठलाग सुरू केला. समोर आणि मागे पोलीस दिसल्याने लुटारूंनी आपली कार थांबवली अन् त्यांना पहाटे ३.२० च्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)धोक्याचा पाठलाग, कौतुकाची थापठाणेदार खंदाळे तसेच वाहनचालक अरुण इंगळे यांनी धोका पत्करून आरोपीच्या वाहनाचा पाठलाग केला. त्याचमुळे वेगात पळून जाणारे पहिले दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटलेली रक्कम आणि कार जप्त करण्यात आली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी ठाणेदार भीमराव खंदाळे, सहायक निरीक्षक आर.एल. शिंदे, हवालदार शंकर शुक्ला, अजय पाटील, नायक अरुण इंगळे (चालक), शिपाई जितेंद्र दुबे, विजय मिश्रा, रंजित धनेकर यांचे कौतुक करून त्यांना रोख पुरस्कार जाहीर केला.