शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरील जिल्ह्यांत बदली झालेल्या २९ पोलीस निरीक्षकांची नागपुरात ‘वापसी’

By योगेश पांडे | Updated: March 5, 2024 00:18 IST

१८ पोलीस निरीक्षक जुन्या जिल्ह्यात परतणार

नागपूर : मार्च महिन्यात कधीही लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले होते व नागपुरातील ४७ पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती. मात्र बदलीच्या वेळी पोलीस ठाण्यात कार्यरत नसलेल्या पोलीस निरीक्षकांची बदली अभिप्रेत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून शहरातील २९ पोलीस निरीक्षकांची बदली रद्द करण्यात आली आहे. 

या आदेशानुसार हे पोलीस निरीक्षक शहरात परतणार असून येथे आलेले १८ जण जुन्या जिल्ह्यात परतणार आहेत. ३० जून २०२४ पर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या निरीक्षकांचा ३१ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या यादीत समावेश होता.लोकसभा निवडणुका मुक्त व स्वच्छ वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशांनुसार या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात धाव घेतली होती. 

न्यायाधीकरणाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बदल्यांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपुरातील २९ पोलीस निरीक्षक हे २१ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस ठाण्यात कार्यरत नसल्याने त्यांची बदली अभिप्रेत नसल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यातील एकूण ६५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हे पोलीस निरीक्षक नागपुरात परतणारभानुप्रताप मडावी, अशोक कोळी, मनीष बन्सोड, मनोहर कोटनाके, वैजयंती मांडवधरे, विश्वनाथ चव्हाण, विनोद चौधरी, राजेश पुकाळे, मुकुंद साळुंके, अरविंद भोळे, हरिदास मडावी, बापू ढेरे, जग्वेंद्रसिंह राजपूत, दीपक गोसावी, हनमंत उर्लगोंडावार, नंदा मंगाते, अनिरुद्ध पुरी, अमित डोळस, संजय जाधव, संग्राम शेवाळे, अमोल देशमुख, राजेंद्रकुमार सानप, शुभांगी देशमुख, कविता इसारकर, बबन येडगे, रवींद्र पवार, रवींद्र नाईकवाड,रवी नागोसे, भारत कऱ्हाडे.

हे पोलीस निरीक्षक जाणारमनीष ठाकरे, राहुल आठवले, आसाराम चोरमाळे, शैलेश गायकवाड, दीपाली धडगे, प्रसाद गोकुळे, राजश्री आडे, अशोक भंडारे, सुनील पिंजन, विश्वजित खुळे, बाळकृष्ण सावंत, अरविंद पवार, राजू चव्हाण, सचिन गावडे, ज्ञानेश्वर आव्हाड, गीताराम शेवाळे, विकास धस, अरुण गरड.

टॅग्स :nagpurनागपूर