बाहेरील जिल्ह्यांत बदली झालेल्या २९ पोलीस निरीक्षकांची नागपुरात ‘वापसी’

By योगेश पांडे | Published: March 5, 2024 12:14 AM2024-03-05T00:14:42+5:302024-03-05T00:18:36+5:30

१८ पोलीस निरीक्षक जुन्या जिल्ह्यात परतणार

29 police inspectors transferred to outside districts 'return' to Nagpur | बाहेरील जिल्ह्यांत बदली झालेल्या २९ पोलीस निरीक्षकांची नागपुरात ‘वापसी’

बाहेरील जिल्ह्यांत बदली झालेल्या २९ पोलीस निरीक्षकांची नागपुरात ‘वापसी’

नागपूर : मार्च महिन्यात कधीही लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले होते व नागपुरातील ४७ पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती. मात्र बदलीच्या वेळी पोलीस ठाण्यात कार्यरत नसलेल्या पोलीस निरीक्षकांची बदली अभिप्रेत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून शहरातील २९ पोलीस निरीक्षकांची बदली रद्द करण्यात आली आहे. 

या आदेशानुसार हे पोलीस निरीक्षक शहरात परतणार असून येथे आलेले १८ जण जुन्या जिल्ह्यात परतणार आहेत. ३० जून २०२४ पर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या निरीक्षकांचा ३१ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या यादीत समावेश होता.लोकसभा निवडणुका मुक्त व स्वच्छ वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशांनुसार या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात धाव घेतली होती. 

न्यायाधीकरणाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बदल्यांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपुरातील २९ पोलीस निरीक्षक हे २१ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस ठाण्यात कार्यरत नसल्याने त्यांची बदली अभिप्रेत नसल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यातील एकूण ६५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हे पोलीस निरीक्षक नागपुरात परतणार
भानुप्रताप मडावी, अशोक कोळी, मनीष बन्सोड, मनोहर कोटनाके, वैजयंती मांडवधरे, विश्वनाथ चव्हाण, विनोद चौधरी, राजेश पुकाळे, मुकुंद साळुंके, अरविंद भोळे, हरिदास मडावी, बापू ढेरे, जग्वेंद्रसिंह राजपूत, दीपक गोसावी, हनमंत उर्लगोंडावार, नंदा मंगाते, अनिरुद्ध पुरी, अमित डोळस, संजय जाधव, संग्राम शेवाळे, अमोल देशमुख, राजेंद्रकुमार सानप, शुभांगी देशमुख, कविता इसारकर, बबन येडगे, रवींद्र पवार, रवींद्र नाईकवाड,रवी नागोसे, भारत कऱ्हाडे.

हे पोलीस निरीक्षक जाणार
मनीष ठाकरे, राहुल आठवले, आसाराम चोरमाळे, शैलेश गायकवाड, दीपाली धडगे, प्रसाद गोकुळे, राजश्री आडे, अशोक भंडारे, सुनील पिंजन, विश्वजित खुळे, बाळकृष्ण सावंत, अरविंद पवार, राजू चव्हाण, सचिन गावडे, ज्ञानेश्वर आव्हाड, गीताराम शेवाळे, विकास धस, अरुण गरड.

Web Title: 29 police inspectors transferred to outside districts 'return' to Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर