शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात २,८०१ ‘लम्पी’ बाधित जनावरांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:18 IST

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सध्या लम्पी स्कीन डिसीज जनावरांमध्ये आढळून येत असल्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देमृत्यूची नोंद नाही४८,८०० जनावरांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सध्या लम्पी स्कीन डिसीज जनावरांमध्ये आढळून येत असल्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. या आजाराची देशपातळीवर दखल घेतली जात असून नागपूर विभागामध्ये २ हजार ८०१ जनावरे या आजाराने बाधित असल्याची नोंद प्रादेशिक पशुसंवर्धन कार्यालयाकडे झाली आहे.आंध्रप्रदेशातून सिरोंचा (जि. गडचिरोली) या तालुक्यात मंढीकुटा, चिंतनपल्ली, सिरोंचा, तामंडाळा या भागामधून महाराष्ट्रामध्ये या रोगाचा शिरकाव झाल्याची नोंद पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे आहे. एप्रिल महिन्यात या जनावरांच्या रक्तांचे आणि स्रावांचे नमुने भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऑॅनिमल डिसीजेस या प्रयोगशाळेत तपासले असता लम्पी स्किन डिसीज असल्याचे निष्पन्न झाले.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये २ लाख ५४ हजार २९२ बैल, गायी, म्हशी आहेत. हा आजार विशेषत: पांढऱ्या रंगाच्या जनावरांना अधिक होतो. संकरित जनावरांच्या वासरांना याचा धोका अधिक असतो. मात्र या तुलनेत म्हशींना यापासून धोका कमी असतो. या संदर्भात नागपूर विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त के. एस. कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरांना लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत ४८ हजार ८४० जनावरांचे लसीकरण झाले असून भंडारा जिल्ह्यात १९,९६२, चंद्रपूर जिल्ह्यात १,१५० तर गडचिरोली जिल्ह्यात २६,७२८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने लक्षणे आढळल्यास जनावरांना तातडीने अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे, अशा सूचना राज्य शासनाच्या पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या रोग नियंत्रण शाखेने दिल्या आहेत. म्हशींना गायींसोबत न बांधता त्यांना वेगळे ठेवावे, अशाही सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत.या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी बाधित जनावरांसोबतच इतरही जनावरांना गोट फॉक्स व्हॅक्सिन ही लस दिली जात आहे. शासनाकडून तसेच जिल्हा नियोजन विकास निधीच्या माध्यमातून ही लस खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्याही सूचना आहेत.अशी असतात लक्षणेया आजाराची लागण झालेल्या जनावरांना ताप येतो. अंगावर गाठी येतात. नाकातून तसेच डोळ्यातून स्राव वाहतो. त्यांना अशक्तपणा जाणवतो. चारा खाणे मंदावते. त्यांच्या दुधावरही परिणाम होतो. जनावरांच्या अंगावर विशेषत: मागील पायांवर सूज येते.नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. यासाठी शासनाकडून आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. या आजाराने जनावरे दगावल्याची आतापर्यंत नोंद झालेली नाही._ के.एस. कुंभारे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपूर

 

टॅग्स :cowगायHealthआरोग्य