शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये रेल्वेतून आल्या २८० कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:18 IST

मिहान आता खऱ्या अर्थाने लॉजिस्टिक पार्क बनला आहे. कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (कॉन्कोर) मिहानमधील मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये गुडगांवच्या खटवास डेपोतून २८० कार रेल्वेने २३ मे रोजी आणण्यात आल्या. या सोबतच कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये मध्य भारताकरिता व्यावसायिक सेवा सुरू झाली आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेमुळे वाहतूक खर्चात ४० टक्के कपात होत असल्याची माहिती कॉन्कोरचे मुख्य महाव्यवस्थापक अनुपकुमार सत्पथी यांनी अजनी इनलॅण्ड डेपोमध्ये शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देअनुपकुमार सत्पथी : मिहान बनला मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मिहान आता खऱ्या अर्थाने लॉजिस्टिक पार्क बनला आहे. कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (कॉन्कोर) मिहानमधील मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये गुडगांवच्या खटवास डेपोतून २८० कार रेल्वेने २३ मे रोजी आणण्यात आल्या. या सोबतच कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये मध्य भारताकरिता व्यावसायिक सेवा सुरू झाली आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेमुळे वाहतूक खर्चात ४० टक्के कपात होत असल्याची माहिती कॉन्कोरचे मुख्य महाव्यवस्थापक अनुपकुमार सत्पथी यांनी अजनी इनलॅण्ड डेपोमध्ये शनिवारी पत्रपरिषदेत दिली.सत्पथी म्हणाले, मिहान पार्कमध्ये कॉन्कोरद्वारे कंटेनरसह वॅगन हॅण्डलिंग (प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल) सेवा देण्यात येते. सध्या खापरीमध्ये लूप लाईन आहे. याद्वारे सध्या २८० मारुती कारची खेप मिहान पार्कमध्ये पोहोचली आहे. रेल्वेने कार वा अन्य उत्पादन आणल्याने वेळ, वाहतूक खर्चाची बचत आणि उत्पादनाची चोरी व खराब होण्याची शक्यता नसते. मध्य रेल्वे, नागपूर मंडळातर्फे खापरी येथे रेल्वे स्टेशन, अतिरिक्त एक लूप लाईन, सिग्नल, केबिन आदींचे काम होणार आहे. या कामासाठी कॉन्कोरने ४६ कोटी रुपये दिले आहे.हे काम लवकरच पूर्ण होण्यासाठी कॉन्कोरतर्फे मंडळ रेल्वे व्यवस्थापन स्तरावर चर्चा करण्यात येत आहे. आता नवीन डीआरएम सोमेश कुमारसोबत या प्रश्नावर चर्चा करून रेल्वे संबंधित कार्य लवकरच पूर्ण करण्याची विनंती करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच प्रत्येक महिन्यात पार्ककरिता ४ ते ६ रॅक (रेल्वे) हॅण्डल करता येईल. यासोबतच कॉन्कोरला पूर्ण क्षमतेने काम करता येईल.पत्रपरिषदेत कॉन्कोरचे मुख्य व्यवस्थापक राजीब भोवाल, अतिरिक्त अधिकारी (सी अ‍ॅण्ड ओ) सुनील वालदे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.यावर्षी होणार चार मोठे वेअरहाऊससत्पथी म्हणाले, कॉन्कोरच्या मिहानमधील १२० एकरातील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये ६० हजार चौरस फूट जागेत दोन वेअरहाऊस बनविण्यात आले आहेत. याच आकाराच्या दोन वेअरहाऊसचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होतील. यासोबत आणखी दोन वेअरहाऊसचा प्रस्ताव आहे. यामुळे मिहान पार्कमध्ये कॉन्कोरचे सहा मोठे वेअरहाऊस होतील. यामुळे मध्य भारताची वेअरहाऊसची समस्या दूर होणार आहे.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर