शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रशियात अडकलेल्या २८ विद्यार्थ्यांना पोहोचविले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 22:57 IST

कोरोनाच्या संकटामुळे रशियात अडकलेले २८ विद्यार्थी सकाळी विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले. ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ते मायदेशी परतले. यात पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना सोडून देण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून दिली. त्यातून हे सर्वजण सोमवारी सकाळी रवाना झाले.

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटामुळे रशियात अडकलेले २८ विद्यार्थी सकाळी विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले. ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ते मायदेशी परतले. यात पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना सोडून देण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून दिली. त्यातून हे सर्वजण सोमवारी सकाळी रवाना झाले.रशियात अडकलेल्या शंभराहून अधिक भारतीयांना वंदे भारत अभियानांतर्गत स्वदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मॉस्कोहून या प्रवाशांना दिल्लीत आणण्यात आले. महाराष्ट्रातील रहिवाशांना दिल्लीहून विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आणण्यात आले. सोमवारी पहाटे ४.३० वाजता या विमानाने नागपूर विमानतळ लँडिंग केले. नियमानुसार सर्व प्रवाशांची तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचे स्टॅम्प लावण्यात आले. नागपूर व लगतच्या भागातील प्रवाशांनी वाहनांची सोय करून ठेवली होती.या विमानातून पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईच्या २८ प्रवाशांचेही आगमन झाले. जिल्हा प्रवेशबंदी कायदा लागू असल्याने वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. कायदेशीर अडचण असल्याने प्रशासनाकडून एसटी महामंडळाकडे मदतीसाठी विचारणा करण्यात आली. महामंडळाने प्रवाशांना सोडून देण्याची तयारी दाखवत बस उपलब्ध करून दिली. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही बस नागपूर विमानतळावर पोहोचली. या ठिकाणी नियमानुसार सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ही बस प्रवाशांना घेऊन रवाना झाली.यापूर्वी शुक्रवारीही दोहाहून १४७ प्रवासी नागपुरात पोहोचले. यात भोपाळ व इंदूरच्या सुमारे १५ प्रवाशांचा समावेश होता. एसटी महामंडळाच्या बसमधूनच त्यांना त्यांच्या शहरात सोडून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :Studentविद्यार्थीrussiaरशिया