शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील २८ सॉ मिल असुरक्षित; पाचला सील ठोकण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:27 IST

मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील २८ सॉ मिल असुरक्षित घोषित केलेल्या आहेत. तसेच पाच सॉ मिल सील करण्याचे आदेश विभागाने जारी केले आहेत. शहर व लगतच्या भागातील सॉ मिलला आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. आग नियंत्रणाची यंत्रणा नसल्याने व नियमांचे पालन होत नसल्याने आगीच्या घटना घडत असल्याचे विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

ठळक मुद्देआगीचा निवासी क्षेत्राला धोका : नोटीस बजावल्यानंतरही उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील २८ सॉ मिल असुरक्षित घोषित केलेल्या आहेत. तसेच पाच सॉ मिल सील करण्याचे आदेश विभागाने जारी केले आहेत.शहर व लगतच्या भागातील सॉ मिलला आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. आग नियंत्रणाची यंत्रणा नसल्याने व नियमांचे पालन होत नसल्याने आगीच्या घटना घडत असल्याचे विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. अग्निशमन विभागाच्या कळमना केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १६ सॉ मिलने मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. लकडगंज झोन क्षेत्रातील १० तर कॉटन मार्के ट परिसरातील दोन सॉ मिल असुरक्षित आहेत.सॉ मिल चालक मानकानुसार उपाययोजना करीत नसल्याने आगीचा धोका अधिक असतो. आग लागल्यास आजूबाजूच्या निवासी क्षेत्रात ही आग पसरण्याचा धोका असतो. हा गंभीर प्रकार आहे. सॉ मिल शहरालगतच्या भागात अधिक होत्या. परंतु मागील काही वर्षांत शहराचा विस्तार झाल्याने या सॉ मिल निवासी क्षेत्रात आल्या आहेत. असे असूनही सॉ मिल चालक आग नियंत्रणासाठी उपाययोजना करीत नसल्याने, अशा सॉ मिलला सील ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.मिल परिसरात आग विझविण्यासाठी स्प्रिंकलरची व्यवस्था, फायर अलार्म नाही. लाकडाचा साठा खुल्या जागेत ठेवला जातो. यामुळे आग लागण्याचा धोका अधिक असतो. याचा विचार करता सॉ मिल परिसरात विहिरी असणे गरजेचे आहे. कळमना केंद्राने १६ सॉ मिलचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. लकडगंज व कॉटन मार्केट भागातही संबंधितावर कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे नोटीस बाजवल्यानंतरही काही सॉ मिल उपाययोजना न करता सर्रास सुरू आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरfireआग