शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

२६ रोजी नागपुरातील संविधान चौकात शिक्षक महिला करणार मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 23:03 IST

नागपूर महानगरपालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता संघटनेने वेळोवेळी विविध मार्गाने शांततापूर्वक आंदोलने करण्यात आली, परंतु शासन व प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून सामूहिक मुंडण आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. मुुंडणासाठी महिला शिक्षकांनीही आपली नावे नोंदविलेली आहेत.

ठळक मुद्देमनपा शिक्षकांचे सामूहिक मुंडण आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता संघटनेने वेळोवेळी विविध मार्गाने शांततापूर्वक आंदोलने करण्यात आली, परंतु शासन व प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून सामूहिक मुंडण आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. मुुंडणासाठी महिला शिक्षकांनीही आपली नावे नोंदविलेली आहेत.आंदोलने केली त्यात धरणे आंदोलन, निर्धार सभा, निषेध सभा, लक्षवेध आंदोलन, विधानसभेवर मोर्चा तसेच साखळी उपोषण करण्यात आले. एवढेच नव्हे शिक्षक दिनाच्या प्रशासकीय कार्यक्रमावर सामूहिक बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतरही शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता संविधान चौक येथे २६ सप्टेंबरला दुपारी दीड वाजतापासून मुंडण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आंदोलनात मुंडण करण्यासाठी शेकडो शिक्षकांनी सहमती दर्शवली आहे. यात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे, देवराव मांडवकर ,मधुकर भोयर, दीपक सातपुते, अशोक बालपांडे, प्रफुल चरडे, विनायक कुथे, प्रकाश देऊळकर, आनंद नागदिवे, अशोक वायकुळे, राकेश दुंप, शेखर वानस्कर, रामराव बावणे, अजय गुंडमवार ,श्रीकांत गडकरी, रवी खंडाईत, अनिल बारस्कर, गजानन सेलोरे, सय्यद हसन अली, संतोष विश्वकर्मा, नितीन भोळे, अरुण ढोबळे, लक्ष्मण बगडे, प्रमोद वाघाडे,चंद्रमणी मून, राजकुमार बोंबाटे, कृष्णा उजवणे, विनय बरडे, ज्ञानेश्वर शेंडे आदींनी केस दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.कोणतेही आंदोलन यशस्वी करण्याकरिता एकजुटीची आवश्यकता आहे, याकरिता जास्तीत जास्त शिक्षकांनी या आंदोलनाकरिता तसेच संघटनेचे बळ वाढवण्याकरिता सहमती दर्शवून आपले नाव संघटनेत द्यावे असे आवाहन संघटनेने केले आहे. २६ सप्टेंबरपर्यंत मुंडण आंदोलनासाठी शेकडो शिक्षकांची नोंदणी होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.महिला शिक्षकही केसदान करणारशिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लागाव्या यासाठी मुंडण आंदोलनात शिक्षक महिलाही सहभागी होणार आहेत. यासाठी पहिल्याच दिवशी पाच महिला शिक्षकांनी नावे नोंदविली. यात कल्पना महल्ले, गीता विष्णू, संध्या तावडे यांच्यासह अन्य शिक्षक महिलांचा समावेश आहे. बुधवारपर्यंत मोठ्याप्रमाणात महिला श्क्षिक मुंडणासाठी नोंदणी करणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTeacherशिक्षक