शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या पूरग्रस्तांसाठी सरसावले रेल्वेचे २६ हजार कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:24 IST

केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवसात गोळा झालेले लाखो रुपये पंतप्रधान मदत निधीत जमा करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देएक दिवसाचे वेतन देणार : आठ दिवसात गोळा करणार रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवसात गोळा झालेले लाखो रुपये पंतप्रधान मदत निधीत जमा करण्यात येणार आहेत.केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून खाद्यसामुग्रीसह इतर वस्तू रवाना करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने ही सामुग्री पाठविणाºया संस्थांकडून एक रुपयाही न घेता सामुग्री पाठविण्याची घोषणा केली आहे. एवढ्यावरच रेल्वेचे कर्मचारी थांबले नाहीत, तर पूरग्रस्तांसाठी काहीतरी ठोस मदत करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी सरसावले आहेत. त्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर, वर्धा, धामणगाव, पुलगाव, काटोल, नरखेड, पांढुर्णा, बैतुल, वरोरा, हिंगणघाट, अजनी मिळून एकूण १५ हजार कर्मचारी आहेत. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोतीबाग, इतवारी, गोंदिया, भंडारा, डोंगरगड, राजनांदगाव, छिंदवाडा, नैनपूरसह लहानमोठे असे ७६ स्टेशन आहेत. येथील ११५०० कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. गँगमनपासून तर अधिकाºयांपर्यंत सर्वच जण आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत निधीत रक्कम जमा करणार आहेत. आगामी २६ तारखेपर्यंत मदतनिधी गोळा करून आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत गोळा झालेली रक्कम पंतप्रधान मदतनिधीत जमा करण्यात येणार आहे. रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून देशप्रेमाची भावना दाखवून दिली आहे.महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करणार रक्कम‘रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात करून गोळा करण्यात येईल. गोळा झालेली रक्कम आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पंतप्रधान मदतनिधीत जमा करण्यात येणार आहे.’-ए. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.

टॅग्स :railwayरेल्वेKerala Floodsकेरळ पूर