शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

२५०० वर रेमडेसिवीर एक्सपायरीच्या उंबरठ्यावर; कोरोनाचे रुग्ण घटल्याने फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 11:58 IST

Nagpur News Corona ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. परिणामी, जवळपास २५०० इंजेक्शनचा साठा कालबाह्य होण्याच्या म्हणजे एक्सपायरीच्या उंबरठ्यावर आहे.

ठळक मुद्देइंजेक्शनची कालबाह्य मुदत तीन महिन्यांचीच

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात नागपुरातील रुग्णसंख्येने धडकी भरवली होती. यातच कोरोनावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीरसारख्या इंजेक्शनचा तुटवडा पडला होता. विविध खासगी हॉस्पिटलसह औषध विक्रेत्यांनी कंपनीकडे या इंजेक्शनची मागणी केली. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठा साठा आला. ऑक्टोबर महिन्यात मात्र रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. परिणामी, जवळपास २५०० इंजेक्शनचा साठा कालबाह्य होण्याच्या म्हणजे एक्सपायरीच्या उंबरठ्यावर आहे.नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुभार्वाला सुरुवात झाली. परंतु ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या वाढीने वेग धरला. ऑगस्ट महिन्यात २५ हजार २२९ नव्या रुग्णांची भर पडली. सप्टेंबर महिन्यात याच्या दुप्पट, ५२ हजार १५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी होती. कोविडच्या उपचारात मोजक्याच औषधी आहेत. रेमडेसिवीर हे इंजेक्शन पहिल्या पाच दिवसांत रुग्णांना दिल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचा डॉक्टरांचा अनुभव होता. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. परंतु मागणीच्या तुलनेत मोजकाच साठा असल्याने तुटवडा पडला. परिणामी, काळाबाजार झाला.

शासनाला यात लक्ष घालून ठराविक औषधांच्या दुकानात २,३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे लागले. रुग्ण वाढणार या भीतीने काही औषध विक्रेत्यांनी व खासगी हॉस्पिटलनी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी केली. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्येत घट आल्याने अनेकांकडे या इंजेक्शनचा साठा पडून आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला २५०० इंजेक्शन नागपुरात आहे. परंतु रुग्ण फारच कमी असल्याने व एक्सपायरी डेट केवळ तीनच महिन्याची असल्याने कालबाह्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नॉनकोविड औषधांनाही फटकाकोरोनाच्या सात महिन्याच्या काळात नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी घट आली होती. मेयो, मेडिकलची ओपीडी इतर दिवशी तीन हजारावर जायची ती ५००वर आली होती. खासगी हॉस्पिटलमधीलही हीच स्थिती होती. यामुळे या रुग्णांना लागणाऱ्या साधारण औषधांची उचलच झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, शासकीय रुग्णालयात अशा १० टक्के औषधीही एक्सपायरीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस