शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२५० वैद्यकीय शिक्षक पदावनत : मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 20:12 IST

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कार्यरत वैद्यकीय शिक्षकांना कालबद्ध पदोन्नती न देता तदर्थ (तात्पुरत्या) पदोन्नतीचे धोरण राबविले. परंतु आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने (डीएमईआर) ही तात्पुरती पदोन्नती समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे २०० ते २५० वर वैद्यकीय शिक्षकांवर पदावनत होण्याची वेळ आली आहे. ‘डीएमईआर’च्या या कारभाराबाबत डॉक्टरांमध्ये असंतोष आहे.

ठळक मुद्देतदर्थ पदोन्नती समाप्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कार्यरत वैद्यकीय शिक्षकांना कालबद्ध पदोन्नती न देता तदर्थ (तात्पुरत्या) पदोन्नतीचे धोरण राबविले. परंतु आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने (डीएमईआर) ही तात्पुरती पदोन्नती समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे २०० ते २५० वर वैद्यकीय शिक्षकांवर पदावनत होण्याची वेळ आली आहे. ‘डीएमईआर’च्या या कारभाराबाबत डॉक्टरांमध्ये असंतोष आहे.पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी व ज्या मेडिकल कॉलेजमध्ये ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या निकषानुसार वैद्यकीय शिक्षक नाही त्या जागा दाखविण्यासाठी ‘डीएमईआर’ने २० जुलै २०१७ रोजी सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांना तदर्थ पदोन्नती दिली. राज्यात २०० ते २५० वैद्यकीय शिक्षकांना याचा लाभ मिळाला. मात्र, ही पदोन्नती ३६० दिवसांची होती. याची मुदत १९ जुलै २०१८ रोजी संपली. ‘डीएमईआर’ने याला मुदत वाढ न देता ही पद्धतच समाप्त करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत झालेल्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक तर सहयोगी प्राध्यापकांना सहायक प्राध्यापक आपल्या मूळ पदावर आले. ज्येष्ठता सूचीला डावलून नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती दिल्यामुळे अखेर या वैद्यकीय शिक्षकांवर पदावनत होण्याची वेळ आली आहे. शोधनिबंध सादर न करणाऱ्या डॉक्टरांची पदोन्नती रद्द करण्यात येईल, असेही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने स्पष्ट केले होते. मात्र मर्जीतील डॉक्टरांनी शोधनिबंध सादर न करताही त्यांची पदोन्नती कायम ठेवली असल्याची माहिती आहे.‘डीएमईआर’च्या कारभारामुळे वैद्यकीय शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे. सूत्रानूसार, लवकर याबाबत नवीन निर्णय होण्याची शक्यता आहे. या शिक्षकांना आपल्या मूळ पदावर रुजू करून घेण्याचे आदेश अधिष्ठात्यांना असल्याने त्यांनी आपले काम बजावणे सुरू केले आहे.तदर्थ पदोन्नतीवर लवकरच निर्णयप्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांना देण्यात आलेली तदर्थ पदोन्नती मागे घेण्यात आली आहे. याचा फटका २५० वर डॉक्टरांना बसला आहे.  राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेच्यावतीने याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.डॉ. समीर गोलावारअध्यक्ष,  राज्य वैद्यकीय शिक्षण संघटना

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर