शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur | २५ महिला शौचालये कुलूपबंदच; महिलांच्या प्रश्नाविषयी मनपा उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 16:14 IST

महानगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक नगरसेविका आहेत, अडीच वर्षांपूर्वी एक महिला महापौरही राहिली आहे. परंतु त्या महिलांच्या ज्वलंत प्रश्नांविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीत महिलांची कुचंबणा : शहरात मनपाची १०२ सार्वजनिक शौचालये

नागपूर : उपराजधानीचे शहर व आता स्मार्ट सिटी म्हणून मिरविणाऱ्या नागपुरात प्रसाधनगृहाअभावी महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच रोटरी क्लबने बांधलेले २५ प्रसाधनगृह मनपाने दोन वर्षांपासून कुलूपबंद केले आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक नगरसेविका आहेत, अडीच वर्षांपूर्वी एक महिला महापौरही राहिली आहे. परंतु त्या महिलांच्या ज्वलंत प्रश्नांविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

शहरात दररोज लाखो महिला नोकरी, खरेदीसह विविध कामांसाठी घराबाहेर पडतात. त्यांसाठी शहरात पुरेशा सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. परंतु शहरात १०२ सार्वजनिक शौचालये असून यात केवळ ७७३ सिट्स आहे. यात पुरुषांसाठी ४८८ तर महिलांसाठी २८५ सिट्स आहे. ३० लाख लोकसंख्येच्या शहरात ५० टक्क्यांपर्यंत महिला आहे. महिलांबाबत विचार केल्यास १५ लाखांच्या संख्येमागे केवळ २८५ सिट्स आहे. अनेक प्रसाधनगृहे सहज दृष्टीस पडेल अशा ठिकाणी नाही. शहरातील अनेक भागात महिलेसाठी एकही प्रसाधनगृह नाही. अनेक महिला नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. त्यांना केवळ कार्यालयाचाच आधार असतो.

- महिलांना किडनीच्या आजाराचा धोका

नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते दरवर्षी किडनीच्या आजाराने लाखो नागरिक ग्रस्त होतात. यात महिलांचे प्रमाण मोठे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत महिलांसाठी प्रसाधनगृह नसणे हे महत्त्वाचे कारण आहे.

ही अडचण लक्षात घेऊन रोटरीने शहरात महिलांसाठी ५० प्रसाधनगृह बांधण्याचा संकल्प केला. त्यानुसार शहरातील विविध भागात महिलांसाठी २५ प्रसाधनगृह बांधले. काही वर्ष त्यांनी शौचालयाची देखभाल केली. त्यानंतर मनपाकडे हस्तांतरित केले. पण मनपा देखभाल करू न शकल्याने हे प्रसाधनगृहे कुलूपबंद आहे. आता रोटरीचेदेखील याकडे दुर्लक्ष झाले आहे.

- टॉयलेट बसचा प्रयोग फसला

वर्दळी भागात, आठवडी बाजारात महिलांसाठी शौचालयासाठी अडचणी जातात. महिलांसाठी शौचालये उपलब्ध व्हावी, यादृष्टीने परिवहन विभागाच्या जुन्या भंगार पडलेल्या बसेसचा योग्य पुनर्वापर करून महिलांसाठी टॉयलेट बस निर्माण करण्यात येणार होते. प्रारंभीच्या काळात प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात येणार होत्या, परंतु हा प्रयोगही फसला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWomenमहिलाnagpurनागपूर