शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
2
नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...
3
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: "आमचा विजय निश्चित, विरोधी पक्ष उद्या काय सांगायचे? याची प्रॅक्टिस करतायेत" - फडणवीस
4
Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया?
5
आयटी कंपन्यांवर 'नव्या लेबर कोड'ची संक्रांत! TCS, इन्फोसिसच्या नफ्यात मोठी घट; काय आहे कारण?
6
निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
7
...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
8
"पालिका निवडणुकांसाठी शेअर बाजार बंद ठेवणं खराब नियोजनाचं लक्षण," का म्हणाले नितीन कामथ असं?
9
"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
10
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
11
Fitness Tips: जिमच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या 'या' ७ चुका आजच थांबवा!
12
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
13
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मोदी सरकार देतंय ९० हजारांचे कर्ज; अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
14
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
15
भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
16
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
17
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
18
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
19
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
20
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील २५ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:01 IST

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे. बुधवारी नासुप्रच्या पूर्व विभाग पथकाने २५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली.

ठळक मुद्देनासुप्रचे पथक रात्री उशिरापर्यंत सक्रिय : कळमना व नंदनवन ठाण्यांतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे. बुधवारी नासुप्रच्या पूर्व विभाग पथकाने २५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली.सभापती अश्विन मुद्गल यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जलवार यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. पथकाने कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डिफेन्स कॉलनीतील नागराज मंदिर, डिप्टी सिग्नल मधील बजरंग मंदिर, डिप्टी सिग्नल शितलामाता मंदिर जवळील शिव मंदिर, डिप्टी सिग्नल,सेवाराम शाहू यांचे घराजवळील शिव मंदिर, बाजार चौक, डिप्टी सिग्नल येथील राम मंदिर, संतोषीमाता नगरातील संतोषी माता मंदिर, शिव मंदिर, गिल्लारे गेट जवळील उडता हनुमान मंदिर, नाग मंदिर, गोपाल नगरातील गुरुदेव राम मंदिर, हनुमान मंदिर, बडा देव, बाजार चौकातील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर तोडण्यात आले.नंदवन पोलीस स्टेशन अंतर्गत संघर्ष नगरातील दोन शिव मंदिर, हनुमान मंदिर, जयस्तंभ, श्रावण नगरील नाग मंदिर, वाठोडा घाट येथील हनुमान मंदिर, सूरज नगरातील दुर्गा मंदिर,हनुमान मंदिर व गणेश मंदिर, भांडेवाडी डम्पिंग यार्ड रोडवरील हनुमान मंदिर, गणेश मंदिर, सूरज नगरातील पंचशील ध्वज, श्रावण नगर,वाठोडा येथील सय्यद साहब ध्वज, गजानन नगर हॅरिसन लॉन येथील सार्वजनिक नागोबा मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले. सकाळी १० वाजता सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कार्यवाही पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी(पूर्व) भरत मुंडले, कनिष्ठ अभियंता अविनाश घोगले, दीपक धकाते, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील व कळमना आणि नंदनवन पोलीस विभागाच्या नेतृत्वात करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास