शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई विमान तिकिटांचे २५ हजारी उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:56 IST

शपथविधीला पोहोचण्यासाठी अनेकांना तिकीटच मिळाले नाही : समृद्धी महामार्गाने शेकडो समर्थक रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेकांनी विमानाने मुंबईवारीचा बेत आखला. मात्र, बुधवारी सायंकाळच्या नागपूर-मुंबई विमानाचे तिकीटदर तब्बल २० हजारांवर, तर गुरुवार सकाळच्या विमानाचे तिकीट दर २५ हजारावर पोहोचले. त्यामुळे शेकडो शुभचिंतक बुधवारी सायंकाळनंतर आपल्या चारचाकी वाहनांनी समृद्धी महामार्गाने मुंबईसाठी रवाना झाले. 

फडणवीस मुख्यमंत्री होणार ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. फडणवीस यांचा मोठा चाहता वर्ग नागपूरसह विदर्भात आहे. त्यामुळे त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी अनेकांनी मुंबईवारीचा बेत आखला. अनेकांनी गुरुवारी सकाळी विमानाने रवाना होण्याचे नियोजन केले. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत गुरुवार सकाळच्या नागपूर-मुंबई विमानाच्या तिकीट दरांनी २० हजार रुपयांचा पल्ला ओलांडला. 

इंडिगोचे (जीई ५००२) सकाळी ६:०५ वाजता मुंबईला जाणाऱ्या विमानाचे तिकीट १७ हजार ६६९ रुपयांवर होते, तर इंडिगोच्या सकाळी ८:२५ वाजताच्या विमानाचे तिकीट तब्बल २० हजार ७२० रुपयांवर पोहोचले होते. एअर इंडियाच्या (एआय ६२८) विमानाचे तिकीट सायंकाळी ६ वाजता १६ हजार १६० रुपयांना होते. मात्र, सायंकाळी ७.१५ वाजता हे दर वाढून तब्बल २५ हजार ३४९ रुपयांवर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत तिकीट दरात हजार- दोन हजार रुपयांचा चढउतार सुरू होता. मात्र, तिकीट दर फारसे कमी झाले नाही. विमान तिकिटांचे वाढलेले दर पाहून अनेकांनी समृद्धी महामार्गाने मुंबई गाठणे पसंत केले. बुधवारी सायंकाळनंतर शेकडो चारचाकी वाहने समृद्धी मार्गाने मुंबईसाठी रवाना झाली.

ट्रॅव्हल एजन्सींनीही हात वर केले विमान तिकिटांचे वाढलेले दर पाहून अनेकांनी ट्रॅव्हल एजन्सींशी संपर्क साधला; पण त्यांनीही हात वर केले. नागपूरहून मुंबईला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे विमान कंपन्यांकडूनच दर वाढविण्यात आले आहेत, असे ट्रॅव्हल एजन्सींकडून सांगण्यात आले. 

बुधवारी रात्रीचे तिकीटही २० हजारांवर बुधवारी रात्रीच्या एअर इंडिया व इंडिगो या दोन्ही विमानांचे नागपूर-मुंबई तिकीट २० हजारांवर पोहोचले होते. महागड्या तिकिटांमुळे शपथविधीच्या पूर्वसंध्येला विमानाने मुंबई गाठण्याचा अनेकांचा बेत हुकला.

टॅग्स :nagpurनागपूरMumbaiमुंबई