शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरने दिले २५ लाख, तर कंटेनरमधून मिळाले साडेअठरा कोटी; रेल्वेच्या वाहतुक विभागाची चांदी 

By नरेश डोंगरे | Updated: September 10, 2023 14:11 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ऑगस्ट महिन्यात माल वाहतूकीतून प्राप्त केलेल्या उत्पन्नाची आकडेवारी उघड केली आहे.

नागपूर : शेतकरी मित्र अन् शेतीचा अभिन्न भाग मानला जाणाऱ्या ट्रॅक्टरने रेल्वेला गेल्या महिन्यात चक्क २५ लाख रुपये दिले आहे. होय, ट्रॅक्टरच्या वाहतुकीतून रेल्वेला २५ लाख तर कंटेनर वाहतूकीतून रेल्वे प्रशासनाच्या नागपूर विभागाला चक्क १८ कोटी, ४६ लाखांचा महसुल मिळाला आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ऑगस्ट महिन्यात माल वाहतूकीतून प्राप्त केलेल्या उत्पन्नाची आकडेवारी उघड केली आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. पुर्वी शेतीच्या कामासाठी फार कमी शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करायचे. बैलगाडीवरच शेतीची भिस्त होती. आता मात्र मशागतीसह शेतीचे दुसरे काम, शेतमालाच्या साहित्याची, उत्पादनाची ने-आण तसेच अन्य मालाच्या वाहतुकीसाठीही ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वापर होतो. 

त्यामुळे ट्रॅक्टरची विक्रीही वाढली आहे. हे ट्रॅक्टर जागोजागी पोहचवण्याची जबाबदारी रेल्वेचा मालवाहतुक विभाग करतो. लांब अंतरावर ट्रॅक्टर पोहचविण्यासाठी रेल्वेकडून फारच माफक शुल्क घेतले जाते. त्यामुळे येथून तेथे लांब अंतरावर ट्रॅक्टर चालवित नेण्यापेक्षा कंपन्या आपल्या वितरकापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून ट्रॅक्टर पाठवितात.

गेल्या ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अशा प्रकारे ट्रॅक्टरची वाहतूक करून अवघ्या एका महिन्यात २५ लाख रुपये कमविले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी या महिन्यात रेल्वेकडून ट्रॅक्टर वाहतूक करण्यात न आल्याने एकही रुपया मिळाला नव्हता.अशाच प्रकारे १२१ कंटेनरच्या रॅकची वाहतूक करून रेल्वेने अवघ्या महिनाभरात १८ कोटी ४६ लाख रुपये कमविले आहे.

राखेतून काढले सव्वा कोटीरेल्वेने नागपूर विभागातून ऑगस्ट २०२३ मध्ये फ्लाय अॅश (राखेची) वाहतूक केली. त्यातून चक्क १ कोटी, २४ लाखांची कमाई केली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे