शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत विकासासाठी २५ कोटी  : महावितरणने तयार केला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:15 IST

नागपूर शहरातील पायाभूत सुविधेसाठी महावितरणने २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

ठळक मुद्देचार पॉवर ट्रान्सफार्मर लागणार : सुटीच्या दिवशीही होते अधिकारी कामावर

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महावितरणने शहरातील वीज वितरण व्यवस्थेची जबाबदारी एसएनडीएलकडून अधिकृतरीत्या घेतली असली तरी, महावितरणला सुरुवातीपासून कामकाज करावे लागत आहे. मोहर्रमची सुटी असतानाही महावितरणचे अधिकारी मंगळवारी कामावर होते, हे यावरून सिद्ध होत आहे. त्याचबरोबर शहरातील पायाभूत सुविधेसाठी महावितरणने २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.महावितरणने तयार केलेल्या प्रस्तावानुसार बिनाकी, कामठी रोड, जयहिंदनगर व सेमिनरी हिल्स येथे पॉवर ट्रान्सफार्मर लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्यालयांना सुद्धा दुरुस्त करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणचे सिव्हील डिपार्टमेंट कार्यालयांचा तपशिल घेत आहे. सुत्रांचे म्हणणे आहे की, पायाभूत विकासासाठी बुधवारी वीज पुरवठा बंद करून काम करण्यात येईल. महावितरणकडून सांगण्यात आले की, लवकरच यासाठी कार्यक्रम तयार केला जाईल. यासाठी मुख्यालयातून सल्ला घेण्यात येईल. एसएनडीएलची घेताहेत मदतमहावितरण आठ वर्षानंतर शहरातील वीज वितरणाची जबाबदारी सांभाळणार आहे. यासाठी एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांकडून काही तांत्रिक बाजू समजवून घेण्यात येत आहे. एसएनडीएलने लाईनसह संपुर्ण वितरण प्रणालीचे नकाशे महावितरणकडे सोपविले आहे. परंतु ही संपूर्ण यंत्रणा समजण्यासाठी एक महिना लागणार आहे. या दरम्यान एसएनडीएल सोबत समांतर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांनी वीज बिल भरल्याची पावती घ्यावीमहावितरणने ग्राहकांना आवाहन केले की, त्यांनी वीज बिल भरण्याची अधिकृत पावती जरूर घ्यावी. ग्राहकांनी एनएनडीएलच्या नावावर कुठलेही आर्थिक व्यवहार करू नये. कंपनीने आवाहन केले की, कुणी एसएनडीएलच्या नावावर पैसे मागत असेल तर त्याची माहिती पोलिसात अथवा एसएनडीएल कार्यालयाला द्यावी. येणाऱ्या बुधवारपासून ग्राहकांना जे बील मिळणार आहे, त्यात एसएनडीएलचे नाव राहणार नाही. वीज बिल हे महावितरणच्या फॉरमॅटमध्ये राहील .

टॅग्स :mahavitaranमहावितरणfundsनिधी