शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी २४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:11 IST

२०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतर रेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासाठी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यानुसार नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनसाठी ११० कोटी रुपये आणि चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन्ही लाईन मिळून २४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या कामांना आता गती मिळणार आहे. याशिवाय बडनेरा येथील वॅगन रिपेअर डेपोसाठी १५१.६३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे मालगाड्यांचे डबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देनागपूर-अजनी यार्डातील कामांना गती : बडनेरा वॅगन रिपेअर डेपोसाठी १५१.६३ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतररेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये मध्य रेल्वेच्यानागपूर विभागासाठी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यानुसार नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनसाठी ११० कोटी रुपये आणि चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन्ही लाईन मिळून २४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या कामांना आता गती मिळणार आहे. याशिवाय बडनेरा येथील वॅगन रिपेअर डेपोसाठी १५१.६३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे मालगाड्यांचे डबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.अर्थसंकल्पात विदर्भातील अनेक रेल्वे योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागातील तिगाव- चिचोंडा थर्ड लाईन(१६.५३ किलोमीटर)साठी ३५ कोटी रुपये, वर्धा-बल्लारशाह(१३२ किलोमीटर)साठी १६० कोटी रुपये, अमरावती- नरखेड(१३८ किलोमीटर)साठी ९० लाख रुपये आणि इटारसी-नागपूर डबलिंग(२८० किलोमीटर)साठी १८५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिंक बुकमध्ये विविध रेल्वेस्थानक, रेल्वे सेक्शनमध्ये लुप लाईनला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ही व्यवस्था रेल्वेगाड्यांचा वेग व सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक आहे. यात इटारसी-आमला-नागपूर-वर्धा-भुसावळ-जळगाव लुप लाईनसाठी (७.१३.८६ किलोमीटर) ५७.५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर विभागात ठिकठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज, रेल्वे अंडरब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे.चेंगराचेंगरीची स्थिती टाळण्यासाठी फूट ओव्हरब्रिजरेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये नागपूर रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १ ते ८ दरम्यानच्या फूट ओव्हरब्रिजसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत नागपूर रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडील भागात असलेला फूट ओव्हरब्रिज अतिशय अरुंद आहे. तर मुंबई एण्डकडील भागातील फूट ओव्हरब्रिजवरही नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. अनेकदा या फूट ओव्हरब्रिजवर प्रवाशांना दाटीवाटीने मार्ग काढत जावे लागते. मुंबईत फूट ओव्हरब्रिज कोसळून प्रवासी मोठ्या प्रमाणात मृत्यू पावल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर नव्या फूट ओव्हरब्रिजची मागणी समोर आली होती. आता या कामासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा फूट ओव्हरब्रिज तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भविष्यात प्रवाशांच्या चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता उरणार नाही.रेल्वे गेटवरील अपघात होणार कमीनागपूर विभागात रेल्वे क्रॉसिंग गेटवर अनेकदा अपघात होतात. यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे या अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी नागपूर विभागात १५ लेव्हल क्रॉसिंग गेट तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात ८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे गेट तयार झाल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर अपघात कमी होतील. रेल्वे क्रॉसिंग गेटमुळे रेल्वेगाड्यांचा वेगही वाढण्यास मदत होणार आहे.नागपूर, अजनी रेल्वेस्थानकासाठी तरतुदी

  • नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १, २, ३ च्या नुतनीकरणासाठी १ कोटी रुपये
  • अजनीत प्रस्तावित इलेक्ट्रिक लोको मेंन्टेनन्स डेपोसाठी २.६५ कोटी रुपये
  • अजनी इलेक्ट्रिक लोकोशेडला १७५ इंजिनवरून २०० इंजिन ठेवण्याच्या क्षमतेसाठी १.५० कोटी रुपये
  • नागपूर विभागात ७ केंद्रीकृत सिग्नलिंग ब्लॉक हटच्या नुतनीकरणासाठी ४ कोटी रुपये
  • वर्धा-नागपूर इंजिन लुपलाईनसाठी १ कोटी रुपये
  • नागपूर विभागात ५० क्रॉसिंग गेटवर रिमोट टर्मिनल व एलईडी इक्विपमेंटसाठी ४ कोटी रुपये
  • गोधनी-नागपूर-खापरी ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंगसाठी ६ कोटी रुपये
टॅग्स :railwayरेल्वेBudgetअर्थसंकल्पnagpurनागपूर