शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सहा दिवसात २४ टिप्पर पकडले : रेती माफियांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:54 IST

रेती माफियाविरुद्ध चालविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांनी कळमन्यातील चिखली चौकात पाच वाहनांना पकडले. पोलिसांनी वाहन व रेतीसह ७६ लाखाचा माल जप्त केला. वाहतूक पोलिसांनी रेती माफियाविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत गेल्या ६ दिवसात २४ रेतीचे ट्रक पकडले आहेत. त्यामुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचिखलीमध्ये रेती तस्करांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेती माफियाविरुद्ध चालविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांनी कळमन्यातील चिखली चौकात पाच वाहनांना पकडले. पोलिसांनी वाहन व रेतीसह ७६ लाखाचा माल जप्त केला. वाहतूक पोलिसांनी रेती माफियाविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत गेल्या ६ दिवसात २४ रेतीचे ट्रक पकडले आहेत. त्यामुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.वाहतूक पोलीस आतापर्यंत सकाळच्या वेळी कारवाई करीत असत. ही कारवाई लक्षात घेता रेती चोरी करणाऱ्या वाहनचालकांनी आपला वेळ व मार्गही बदलवून घेतला होता. ते सायंकाळच्या सुमारास रेतीचे ट्रक घेऊन जाऊ लागले होते. याबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी चिखली चौकात अभियान राबवले. यात पोलिसांनी सतीश बाजीराव वाघाडे (२९) कोंडणगड, भंडारा येथील टिप्पर क्रमांक एमएच/२९/एम/५५८, ज्ञानेश्वर श्रीहरी पंदरे (३०) रावणवाडी, भंडारातील टिप्पर क्रमांक एमएच/३६/एफ/३०७५, विजय लक्ष्मण शेंद्रे (२४) पालगाव, भंडारातील टिप्पर क्रमांक एमएच ३६/एफ/१२५४, शेख वसीम शेख बाबू (२८) कमसुरी बाजार, कामठी टिप्पर क्रमांक एमएच ४०/बीजी/४१९७ आणि पुरुषोत्तम गोरेलाल चव्हाण (३०) भवानी नगर, पारडी येथील टिप्पर क्रमांक एमएच/४०/एके/४३८९ ला रोखले. एकाही वाहन चालकाकडे रेतीच्या रॉयल्टीचे दस्तावेज नव्हते. पोलिसांनी वाहन व रेती जप्त केली. वाहतूक पोलिसांनी तहसीलदार आणि परिवहन विभागाला पत्र पाठवून कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या तपासाच्या आधारावर गुन्हा दाखल केला होईल. यापूर्वी हुडकेश्वर हद्दीत १६ आणि प्रतापनगर परिसरात ३ वाहनांना पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पहिल्यांदा वाहतूक पोलिसांनी याप्रकारची मोहीम राबविली आहे. ही मोहीम पुढेही सुरु राहणार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनात वाहतूक विभागाचे डीसीपी गजानन राजमाने, सीताबर्डी विभागाचे एपीआय ओम सोनटक्के, कामठी विभागाचे पीएसआय मोटे आणि सक्करदरा विभागाचे पीएसआय आगरकर यांनी केली.

 

 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया