कोरोना रुग्णांसाठी २४ तास हेल्पलाईन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:55+5:302021-04-05T04:06:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत कुठल्या रुग्णालयात ...

24-hour helpline service for Corona patients | कोरोना रुग्णांसाठी २४ तास हेल्पलाईन सेवा

कोरोना रुग्णांसाठी २४ तास हेल्पलाईन सेवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत कुठल्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे यासह आवश्यक सर्व प्रकारची माहिती रुग्णाला उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. हे कक्ष २४ तास सुरू राहील. या कक्षाचा हेल्प लाईन क्रमांक ०७१२-२५६२६६८ हा असून टोल फ्री क्रमांक १०७७ हा आहे.

या हेल्पलाईन नंबरवर कोविडबाधित व्यक्तीला आवश्यक ती मदत मागता येईल. तसेच विविध रुग्णालयांत उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती, वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर, आयसीयू खाटा आदींबाबत माहिती तसेच विविध रुग्णालयांत कोविड-१९ रुग्णांचे उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसीविर औषध वैद्यकीय ऑक्सिजन याबाबतची माहिती पुरविण्यात येईल. ही हेल्पलाईन मनुष्यबळासह चोवीस तास सुरू राहील. या कोविड नियंत्रण कक्षाद्वारे नागरिकांना २४ तास सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी १२ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. ते पाळीनिहाय येथे सेवा देतील.

हे सर्व अधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून ठरवून दिलेल्या दिवशी व वेळेला सेवा देतील. या वेळेत कोणतीही हयगय न करता नियंत्रण कक्षात सेवा देणे अनिवार्य आहे. कुणी कामात हयगय केली तर संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

हे अधिकारी देणार सेवा

अधिकारी दिनांक (एप्रिल) वेळ

आभा बोरकर, रमेश हरडे ६, ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३० सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

विवेक राठोड व प्रदीप गजभिये ६, ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३० दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत.

एस. झेड. भोतमांगे व आर. एस. गौतमी ६, ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३० रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत.

एन. डी. पेशकर, योगीता यादव व सुशील बनसोड ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

अरविंद जयस्वाल, प्रदीप गजभिये ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९ दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत.

एस. जी. खोरगडे व मधुकर पाटील ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९ रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत.

Web Title: 24-hour helpline service for Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.