शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शाळा दुरुस्तीसाठी २३५ कोटीची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 23:13 IST

सरकारी शाळा व प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी २३५ कोटी रुपये खर्चाची योजना मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. तसेच, केंद्र सरकारने २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांकरिता १०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि बालभारतीने ५७ कोटी रुपये दिले आहेत.

ठळक मुद्देसरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : केंद्र सरकारने १०५ कोटी रुपये दिले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सरकारीशाळा व प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी २३५ कोटी रुपये खर्चाची योजना मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. तसेच, केंद्र सरकारने २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांकरिता १०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि बालभारतीने ५७ कोटी रुपये दिले आहेत.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. गडचिरोली व बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेवर हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. त्यातील अन्य माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांकरिता जिल्हा नियोजन समितीने २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये २० कोटी तर, जिल्हा परिषदेने ६० लाख रुपये दिले. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून ११ कोटी तर, केंद्र सरकारकडून ३६ लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय ऑगस्ट-२०१९ मध्ये राज्यात ५,८२२ नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली. त्यातील ३०८ शिक्षक विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याला ५९ तर, बुलडाणा जिल्ह्याला १०५ शिक्षक देण्यात आले आहेत. न्यायालयात याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. विजय मोरांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळाGovernmentसरकार