शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नागपुरात एका गाडीवर २२६ दवाखान्यांच्या कचऱ्याचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:24 IST

मध्य भारतातील वैद्यकीय ‘हब’ म्हणून उपराजधानीची ओळख असून, हजारो दवाखाने येथे आहेत. दररोज या दवाखान्यांमधून हजारो किलोंचा ‘बायोमेडिकल’ कचरा बाहेर निघतो. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून १२ गाड्यांच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात येतो. मात्र प्र्रत्येक गाडीवर सुमारे २२६ दवाखान्यांचा भार आहे. अशास्थितीत खरोखरच दररोज सर्व दवाखान्यांमधील ‘बायोमेडिकल’ कचरा उचलला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देसर्व दवाखान्यातील ‘बायोमेडिकल’ कचरा उचलला जातोय का? : मनपाने दिले आहे खासगी कंपनीला कंत्राट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य भारतातील वैद्यकीय ‘हब’ म्हणून उपराजधानीची ओळख असून, हजारो दवाखाने येथे आहेत. दररोज या दवाखान्यांमधून हजारो किलोंचा ‘बायोमेडिकल’ कचरा बाहेर निघतो. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून १२ गाड्यांच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात येतो. मात्र प्र्रत्येक गाडीवर सुमारे २२६ दवाखान्यांचा भार आहे. अशास्थितीत खरोखरच दररोज सर्व दवाखान्यांमधील ‘बायोमेडिकल’ कचरा उचलला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा करण्यात आली होती. १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत ‘बायोमेडिकल’ कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या कंपनीने किती जैविक कचरा उचलला, मनपाला यापासून किती महसूल प्राप्त झाला, कचरा उचलण्यासाठी किती दवाखान्यांशी करार झाले आहेत, नियमांचे पालन न करणाऱ्या किती दवाखान्यांना दंड झाला तसेच कचरा उचलणाऱ्या कंपनीकडे किती गाड्या आहेत, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, नागपूर शहरात ‘बायोमेडिकल’ कचरा उचलण्यासाठी एकूण २,७१९ दवाखाने किंवा इतर लोकांचे मनपाशी करार झाले आहेत. कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून १२ गाड्यांमार्फत ही उचल करण्यात येते. याचाच अर्थ एका गाडीवर २२६ दवाखान्यांचा भार आहे. शहराची भौगोलिक स्थिती लक्षात घेता, दररोज एका गाडीवरून इतक्या दवाखान्यांमधील ‘बायोमेडिकल’ कचरा उचलणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्षनिहाय उचलण्यात आलेला कचरावर्ष                      कचरा ( मेट्रिक टनमध्ये)                   महसूल (रुपयांमध्ये)२०१५                     ७१२.६८८                                           ५९,९३,०१७२०१६                     ८२०.७०१                                           ४४,३१,२२०२०१७                     ८५५.७१२                                          ३१,२७,९२०२०१८ (जूनपर्यंत )   ५४४.९८४                                            ८,६०,१७८मनपाला मिळाला सव्वा कोटींहून अधिक महसूल१ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत संबंधित कंपनीने शहरातून २,९३४.०८५ मेट्रिक टन कचऱ्याची उचल केली. सरासरी दररोज शहरांतील दवाखान्यांमधून २.३० मेट्रिक टन ‘बायोमेडिकल’ कचऱ्याची उचल झाली. यासाठी मनपाला कंपनीकडून १ कोटी ४४ लाख १२ हजार ३३५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. सर्वाधिक ५९ लाख ९३ हजार १७ रुपयांचा महसूल २०१५ साली प्राप्त झाला होता. या कालावधीत कचरा उचलण्याच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल डॉ. धांडे यांच्या ‘पॅनोरमा एमआरआय सेंटर’ला २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला.कचरा वाढला, महसूल घटलादरम्यान, २०१५ ते २०१८ या कालावधीत प्रत्येक वर्षी कंपनीकडून कचरा उचलण्याच्या वजनात वाढ झाली आहे. मात्र प्रत्यक्षात मनपाला मिळणारा महसूल दरवर्षी घटत गेला असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMedicalवैद्यकीय