शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नागपुरात उभारणार २२ ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 21:57 IST

Oxygen plants, Nagpur news आरोग्य यंत्रणा सक्षम असणे किती महत्त्वाचे आहे, हे कोरोनाच्या संकटाने चांगलेच दाखवून दिले. यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने सरकारसह प्रशासन त्याच्या नियंत्रणाच्या तयारीला लागले आहे. याअंतर्गत रुग्णालय, बेड, कोविड केअर सेंटर आदी सज्ज ठेवले जात आहे. यासोबतच नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. हे प्लांट उभारण्यात आल्यानंतर नागपुरात ऑक्सिजन तुटवडा कधीच निर्माण होणार नाही.

ठळक मुद्देमेडिकल, मेयो, एम्समध्ये प्रत्येकी दोन प्लांट : प्रत्येक जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातही लागणार प्लांट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आरोग्य यंत्रणा सक्षम असणे किती महत्त्वाचे आहे, हे कोरोनाच्या संकटाने चांगलेच दाखवून दिले. यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने सरकारसह प्रशासन त्याच्या नियंत्रणाच्या तयारीला लागले आहे. याअंतर्गत रुग्णालय, बेड, कोविड केअर सेंटर आदी सज्ज ठेवले जात आहे. यासोबतच नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. हे प्लांट उभारण्यात आल्यानंतर नागपुरात ऑक्सिजन तुटवडा कधीच निर्माण होणार नाही.

जिल्हा प्रशासनाने नागपुरात एकूण २२ प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व एस्म येथे प्रत्येकी दोन प्लांट, तर प्रादेशिक मनोरुग्णालयासह प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी एक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.

५५.३० मेट्रिक टनाचे उत्पादन होणार

या २२ ऑक्सिजन प्लांटमधून दररोज एकूण ५५.३० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल. मेयो, मेडिकल व एम्समध्ये ६.२३ मेट्रिक टनाचे प्रत्येकी दोन प्लांट उभारण्यात येणार आहेत. म्हणजेच या तीन रुग्णालयांतच एकूण ३७..३८ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता निर्माण होईल. यासोबतच १.१२ मेट्रिक टनाचे १६ प्लांट प्रत्येक जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात येतील. म्हणजेच जिल्हा रुग्णालयात एकूण १७.९२ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता निर्माण होईल. त्यामुळे रुग्णालयांना यापुढे ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून

या २२ प्लांटशिवाय नागपुरातच ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी साठवून राहील, अशी व्यवस्थाही केली जात आहे. त्यामुळे नागपुरातील हे सर्व प्लांट पूर्णपणे तयार झाले आहेत आणि समजा एखाद्या वेळी हे सर्व प्लांट काही कारणास्तव एकाचवेळी बंद पडले, तरी नागपूरला किमान आठ दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा नागपुरातच राहील. बाहेरून मागविण्याची गरजच पडणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन