शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसमध्ये प्रवेशाच्या नावावर २२ लाखाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:26 IST

मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर पालकांची २२ लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देमेघे कुटुंबीयांशी जवळचे संबंध असल्याचे सांगून फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर पालकांची २२ लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.विक्रांत दिनेश गेडाम (३०), दिनेश गेडाम (वडील) आणि उमेश गेडाम (काका) रा. रामनगर अशी आरोपीची नावे आहे. फिर्यादी प्रवीण समर्थ (५२) रा. आरटीओ आॅफिस मागे सिव्हील लाईन्स यांच्या मुलीचा गेल्या वर्षी राजस्थानच्या मेडिकल कॉलेजमध्ये डेंटलमध्ये नंबर लागला होता. दरम्यान त्यांच्या पत्नीला एका मैत्रिणीने सांगितले की, त्यांचे एका नातेवाईकाच्या मुलीला विक्रांतने वर्धा सावंगी मेघे येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करून दिली होती. परंतु विशेष कोट्यासाठी काही लाख रुपये द्यावे लागतात. समर्थ दाम्पत्य मुलीला दूर पाठवण्याऐवजी वर्धेत एमबीबीएस करण्यासाठी तयार झाले. त्यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये विक्रांतशी संपर्क साधला. विक्रांतने त्याचे मेघे कुटुंबीयांशी जवळचे संबंध असल्याचे सांगून १७ लाख रुपयात अ‍ॅडमिशन करून देतो असे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून शिफारस पत्रही व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. त्याच्यावर विश्वास करून समर्थ दाम्पत्याने विक्रातला १४ सप्टेंबर रोजी ८ लाख रुपये दिले. यानंतर तो पुण्यात आल्याचे सांगून त्याचे वडील व काकाला घरी पाठवून पैसे मागविले. १५ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतरही त्यांच्या मुलीची अ‍ॅडमिशन झाली नाही. त्यांच्याप्रमाणेच सुनीता गजानन कात्रे यांनीही आपल्या मुलीच्या अ‍ॅडमिशनसाठी ६.५ लाख रुपये दिले होते. अशा प्रकारे आरोपीनी दोन्ही पालकांची २२ लाख ३५ हजाराने फसवणूक केली. चौकशीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसnagpurनागपूर