शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: April 7, 2025 22:03 IST

शेकडो वाहन चालकांपैकी कुणीही दिला नाही मदतीचा हात

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा रस्त्याच्या कडेला मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे तब्बल २२ तास संबंधित व्यक्ती एकाच जागेवर पडून होता. मात्र, कुणीही त्याला दवाखान्यात नेण्याची तसदी दाखविली नाही. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, त्या रस्त्यावरून हजारो वाहन चालक गेले असताना, एकानेही मदतीचा हात न दिल्याने नागरिकांमध्ये इतकी असंवेदनशीलता का वाढते आहे, असा सवाल निर्माण होत आहे.

गोवर्धन भगवानदास शाहू (४३, शनी मंदिराजवळ, कळमना) असे मृतकाचे नाव आहे. रविवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास जुना कामठी मार्ग येथील अन्ना दारू भट्टीसमोरील रस्ता ओलांडताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनने धडक दिली. त्यात शाहू यांच्या पायाला मार लागला व ते खाली पडले. त्यांना प्रभू चौधरी (३५, गणेशनगर, कळमना) याने भट्टीसमोरील एका कबाडी दुकानाच्या टिनाच्या शेडमध्ये लेटविले. शाहू यांना बरे वाटेल, असे वाटल्याने चौधरी तेथून निघून गेला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चौधरी देशी दारूच्या भट्टीसमोर मित्रासोबत आला असता त्याला शाहू तेथेच झोपलेले दिसले. त्याने मित्राला रविवारच्या अपघाताबाबत सांगितले व दोघांनी जाऊन शाहू यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहू निपचित पडले होते. चौधरीच्या मित्राने पोलिसांना फोन करून सूचना दिली. तेथे काही वेळातच गर्दी जमली. गर्दीतून एक महिला समोर आली व ती नेमकी शाहू यांची पत्नी निघाली. पोलिसांनी शाहू यांना मेयो इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रभू चौधरीच्या तक्रारीवरून कळमना पोलिस ठाण्यात अज्ञात पिकअप वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणालाच दिसला नाही का जखमी व्यक्ती?

संबंधित घटनास्थळाजवळच देशी दारूची भट्टी आहे, तसेच तेथून अनेक जण येणे-जाणे करतात. मात्र, शाहू हे निपचित पडलेले दिसल्यावरही एकानेही मदतीचा हात दिला नाही, जर त्यांना वेळेत उपचार मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचू शकला असता. ते मजुरीचे काम करायचे.

टॅग्स :Accidentअपघात