शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर महिन्यात २२ दिवस प्रदूषणाचा स्तर उंचावर, महाल सर्वात प्रदूषित

By निशांत वानखेडे | Updated: January 2, 2024 16:56 IST

हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. दिवसभर वाहनांचा धुर, बांधकामाचे धुलीकण हवेत पसरतात. थंडी व संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात.

नागपूर : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चागला मानला जात असे परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे कारण दरवर्षी हिवाळ्यातील प्रदूषण वाढत चालले आहे. गेला आठवडाभर ढगाळ वातावरण व प्रदूषण मिश्रीत धुरक्यांमुळे नागपूरची हवा खराब केली आहे. धाेकादायक म्हणजे डिसेंबरच्या ३१ पैकी २२ दिवस प्रदूषणाचा स्तर उंचावर हाेता.

हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. दिवसभर वाहनांचा धुर, बांधकामाचे धुलीकण हवेत पसरतात. थंडी व संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. नागपूरमध्ये ऑक्टाेबर, नाेव्हेंबरनंतर डिसेंबरमध्येही प्रदूषणात वाढ झाली. सिव्हिल लाइन्स, महाल, अंबाझरी आणि रामनगर चारही केंद्राची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली आकडेवारी नागपूरकरांची चिंता वाढविणारी आहे. यात महाल परिसरातील स्थिती दिवसेंदिवस खराब हाेत असल्याचे दिसते. या भागात दरराेज प्रदूषणाचा निर्देशांक २५० ते २७० च्या स्तरावर जात असून ताे वाईट श्रेणीत गणल्या जाताे. इतर केंद्राचे प्रदूषण निर्देशांक २३० ते २५० एक्युआयच्या घरात आहे. डिसेंबरच्या ३१ पैकी २२ दिवस हा स्तर वाईट स्थितीत हाेता. यात धुलीकण पीएम-२.५ चे प्रमाण ३०० च्यावर पाेहचल्याची धाेकादायक स्थिती दर्शविण्यात येत आहे. शिवाय कार्बन माेनाक्साईड, साेडियम सल्फाईड व ओझाेनचे प्रमाणही प्रदूषण स्तराच्या वर आहे. हे प्रदूषण आधिच श्वसनरोग असणाऱ्यांना हानिकारक असते. नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात.दमा, ब्रॉंकायटिस, टीबी, हृदय रोग, कर्कराेग आणि मानसिक आजारही बळावण्याचा धाेका वाढला आहे.

महाल

- ० ते ५० निर्देशांकाच्या चांगल्या स्थितीत एकही दिवस नव्हता.

- ५१ ते १०० च्या समाधानकारक स्थितीत ९ दिवस हाेते.

- १५ दिवस वायु गुणवत्ता निर्देशांक १०१ ते २०० दरम्यान हाेता.

- तब्बल ७ दिवस प्रदूषणाचा स्तर २०१ ते ३०० च्या टप्प्यावर हाेता.

सिव्हिल लाईन्स

- दाेन दिवस चांगल्या स्थितीत व १० दिवस ५१ ते १०० एक्युआयच्या समाधानकारक स्थितीत हाेते.

- १०१ ते २०० निर्देशांकाचे १० दिवस प्रदूषित हाेते.

- ९ दिवस निर्देशांक २०१ ते २५० च्या वाईट स्थितीत हाेता.

अंबाझरी

- परिसरात दाेन दिवस चांगले तर ११ दिवस समाधानकारक हाेते.

- ८ दिवस स्तर १०१ ते २०० वर हाेता. ८ दिवस निर्देशांक वाईट स्थितीत गेला.

रामनगर

- दाेन दिवस चांगले व १३ दिवस समाधानकारक हाेते.

- १०१ ते २०० च्या दरम्यानचे १० दिवस प्रदूषित हाेते.

- परिसरात ५ दिवस निर्देशांक २०१ ते २५० च्या वाईट स्थितीत हाेते.

थर्टी फर्स्टची हवा सर्वत्र खराब

दरम्यान ३० व ३१ डिसेंबरला प्रदूषणाचा स्तर सर्वत्र २०० च्यावर हाेता. महाल भागात ३० व ३१ डिसेंबरला प्रदूषणाचा निर्देशांक २७२ हाेता. रामनगर परिसरात एक्युआय २४९ ते २५७ च्या स्तरावर हाेते. अंबाझरी व सिव्हिल लाईन्स परिसरात निर्देशांक २३६ ते २४० वर हाेता. नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला महाल भागात निर्देशांक २७५ वर गेला आहे व २ जानेवारीलाही ताे २३६ वर आहे. सर्व दिवशी धुलीकणांचा स्तर ३०० च्यावर पाेहचला असून ताे चिंताजनक आहे. ओझोन, कार्बन मोनाॅक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड आदींचे प्रमाणही प्रदूषित स्तरावर आहे.

टॅग्स :nagpurनागपूरpollutionप्रदूषण