शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाच्या भितीने राज्यातील २१३३ बस फेऱ्या रद्द; एसटीचे ७५ लाखांचे नुकसान

By नरेश डोंगरे | Updated: February 20, 2024 23:15 IST

आजपासून बस सेवा पुर्ववत

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान संतप्त आंदोलकांकडून जाळपोळ, दगडफेक आणि रास्ता रोको केला गेल्याने एसटी महामंडळाला जबर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर, आजपासून पुन्हा बंद केलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या आठवडाभरात एसटीच्या दोन हजारांवर फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाला सुमारे ७५ लाखांचे नुकसान झाले आहे.

मराठा आरक्षणाचा विषय आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सर्वत्र लक्षवेधी ठरले आहे. यावेळी अंतरवाली सराटीत पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यानंतर पाच दिवसांनी उपोषणाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली. मराठवाड्यात अनेक गाड्यांवर दगडफेक, तोडफोड, जाळपोळ, रस्ता रोको करण्यात आल्याने राज्यातील बहुतांश जिल्हा मुख्यालयातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या बसेस आगार प्रमुखांनी बंद केल्या. अधिकृत माहितीनुसार, राज्यातील ३१ जिल्हा मुख्यालयाने मराठवाड्यातील विविध शहरात जाणाऱ्या एकूण २१३३ बस फेऱ्या रद्द केल्या. परिणामी एसटी महांडळाला ७४ लाख, १९ हजार, ४१४ रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, सरकारने आज मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहिर केल्याने आंदोलन निवळले असून, संपूर्ण राज्यातील बसफेऱ्या पूर्ववत झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर विभागाला

आंदोलनाचा सर्वाधिक फटका राज्यातील एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला बसला. या विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी असे एसटीचे सात जिल्हा मुख्यालये आहेत. त्यातून मराठवाड्यातील विविध गाव शहरात ९,६२६ बस फेऱ्या धावतात. आंदोलनाची तीव्रता बघता खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवडाभरात त्यापैकी २,०७० बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.

मुंबईला फटका नाही

या आंदोलनाचा मुंबईच्या एसटी विभागाला कोणताही फटका बसला नाही. मुंबई विभागातून मराठवाड्यात ७,१३९ बसेस जातात. यापैकी सर्वच्या सर्व बसेसचे संचालन सुरळीत होते. तर, नाशिक आणि पुण्यातून अनुक्रमे १२ आणि ८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या दोन विभागाला क्रमश: १ लाख, ६४ हजार, ४५९ आणि १ लाख, ६ हजार, ८० रुपयांचे नुकसान झाले. नागपूरच्या २४ फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे तीन लाखांचे तर अमरावतीच्या ४० बस फेऱ्या रद्द झाल्याने २.३ लाखांचे नुकसान झाले.

टॅग्स :state transportएसटी