शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाखांचे टॅबलेट नागपूर जिल्हा परिषद सदस्यांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:08 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जि.प.चे सदस्यही अपडेट रहावे, या उद्देशातून २१ लाख रुपयांचे टॅबलेट जि.प.च्या पदाधिकाऱ्यांपासून सदस्यांना वाटण्यात आले होते. परंतु नव्याच्या नवलाईसारखे दोन दिवस हे टॅब सदस्यांच्या हाती दिसले. नंतर मात्र हे टॅब घरातच राहिले, तर कुणाच्या मुलांच्या वापरात आले. सध्या तर जि.प.च्या एकही सदस्य अथवा पदाधिकाऱ्याकडे टॅबलेट दिसत नाही.

ठळक मुद्देमाहिती तत्रज्ञानाच्या वापराबद्दल उदासिनता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जि.प.चे सदस्यही अपडेट रहावे, या उद्देशातून २१ लाख रुपयांचे टॅबलेट जि.प.च्या पदाधिकाऱ्यांपासून सदस्यांना वाटण्यात आले होते. परंतु नव्याच्या नवलाईसारखे दोन दिवस हे टॅब सदस्यांच्या हाती दिसले. नंतर मात्र हे टॅब घरातच राहिले, तर कुणाच्या मुलांच्या वापरात आले. सध्या तर जि.प.च्या एकही सदस्य अथवा पदाधिकाऱ्याकडे टॅबलेट दिसत नाही.केंद्र सरकारने घोषित केलेल्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर सदस्यही अपडेट व्हावा व ग्रामस्थांपर्यंत प्रत्येक योजना आणि उपक्रमांची माहिती पोहचविण्यासाठी त्या सदस्यांना टेक्नोसॅव्ही करण्याचा निर्णय जि.प.ने घेतला होता. यासाठी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ग्राम विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ३१ मार्च २०१६ रोजी जि.प. ला पत्र पाठवून टॅबलेटला मंजुरी दिली. यानंतर जि.प.ने निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी करून आपल्या स्वत:च्या सेसफंडातून प्रति टॅबलेट सुमारे ४० हजार अशी ५८ टॅबसाठी २१ लाखावरची तरतूद केली. अ‍ॅपल कंपनीच्या टॅबची खरेदी केली. टॅब कशा पध्दतीने हाताळावा यासाठी जि.प.च्या खेडकर सभागृहात सर्व सदस्यांना एक दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. हे टॅबलेट निवडणुका लागल्यानंतर जि.प.प्रशासनाकडे परत करावे लागणार, अशी अट यात घातल्या गेली होती.विशेष म्हणजे टॅब परत करण्याची अट घातल्यामुळे तो घेण्यासाठी अनेकांनी नकार देऊन नंतर तो स्वीकारलाही. तर एक-दोन सदस्यांनी शेवटपर्यंत तो टॅबही स्वीकारला नाही. ज्या सदस्यांनी तो टॅब स्वीकारला त्यानंतर कधीच कुठल्याही सदस्यांकडे तो टॅब दिसूनही आला नाही.वापरच नाही, तर उद्दिष्ट साध्य कसे होणार ?जि.प.अंतर्गत राबविण्यात येणा ऱ्या योजनांची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी टॅबलेटचा वापर करण्यात येणार होता. जि.प. सदस्य अपडेट राहावेत, त्या उद्देशाने तंत्रज्ञानाशी सदस्यांची मैत्री होणार होती. ग्राम विकास व अन्य विभागांच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहचविता येतील, यासाठी सदस्यांना टॅबलेट देण्याचा निर्णय घेतला व त्याचे वाटपही करण्यात आले. परंतु टॅबचा वापरच नसल्याने जे उद्देश टॅब देण्यामागे होते, ते उद्देश साध्य होऊच शकत नाही.

टॅग्स :tabletटॅबलेटzpजिल्हा परिषद